Reliance Jio 
बिझनेस

Reliance Jio ने आणली धमाकेदार ऑफर, 'या' रिचार्जवर मिळेल ७०० रुपयांचा फायदा

Bharat Jadhav

रिलायन्स जिओने आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीय. काही रिचार्जवर ७०० रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. ही संधी मर्यादित काळासाठी आहे. Jio ग्राहक ५ ते १० सप्टेंबरदरम्यान काही त्रैमासिक आणि वार्षिक प्लान रिचार्ज केल्यानंतर ७०० रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात. कंपनीच्या वेबसाइट jio.com वर ही माहिती देण्यात आली आहे. ही विशेष ऑफर Jio ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवांचा आनंद घेता येणार आहे .

या रिचार्जवर मिळेल फायदा

ग्राहकांना ८९९ रुपये, ९९९ रुपये आणि ३५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानवर फायदा मिळणार आहे.

OTT आणि डेटा पॅक : १७५ रुपयांचा फायदा यात १० OTT आणि १० GB डेटा व्हाउचर समाविष्ट आहे, ज्याची वैधता २८ दिवस असेल.

Zomato गोल्ड मेंबरशिप: तीन महिन्यांसाठी मोफत असणार आहे.

Ajio व्हाउचर: रु. २९९९ किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर रु. ५०० रुपयांची सूट मिळणार आहे.

रु. ८९९ आणि रु ९९९ च्या प्लानमध्ये प्रतिदिन २ GB डेटा मिळेल. याची वैधता अनुक्रमे ९० आणि ९८ दिवस असणार आहे. ३,५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह दररोज २.५ जीबी डेटा मिळेल. या विशेष प्लानमध्ये १० OTT सदस्यता आणि १० GB डेटा पॅक समाविष्ट आहे, ज्याची वैधता २८ दिवस असणार आहे.

जिओने आठ वर्षांत ४९ कोटी ग्राहकांचा आकडा पार केलाय. जिओतून जगातील ८ टक्के मोबाईल ट्रॉफिकचा वापर होतो करते. सरासरी, Jio च्या नेटवर्कवरील प्रत्येक युझर मासिक ३० GB डेटा वापरत आहे. Jio चा भारतातील डेटा ट्रॅफिकमध्ये ६० % वाटा आहे. या व्यतिरिक्त या दिवाळीपासून जिओ आपल्या युझरला 'Jio AI-Cloud स्वागत ऑफर' अंतर्गत १०० GB मोफत क्लाउड स्टोरेज देखील ऑफर करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

Marathi News Live Updates : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT