RELIANCE JIO LAUNCHES CORPORATE JIOFI PLAN STARTING AT ₹299 WITH FREE DEVICE 
बिझनेस

Jio Offer: Jioने आणली जबरदस्त ऑफर! फक्त ₹299 मध्ये मोफत JioFi डिव्हाइस अन् भरपूर डेटा ऑफर

Jio Corporate Plan: रिलायन्स जिओने फक्त ₹२९९ मध्ये आकर्षक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये मोफत जिओफाय डिव्हाइससह ३५ जीबी डेटा मिळणार असून, अधिक डेटाचे पर्यायही उपलब्ध आहेत.

Dhanshri Shintre

  • जिओचा कॉर्पोरेट जिओफाय प्लॅन केवळ ₹२९९ पासून सुरू होतो.

  • मोफत जिओफाय डिव्हाइस आणि २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा मिळते.

  • लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी किफायतशीर इंटरनेट कनेक्शन उपलब्ध.

  • जिओला कॉर्पोरेट कनेक्टिव्हिटी मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे.

रिलायंस जिओने नुकताच २९९ रुपयांच्या मासिक दरामध्ये एक खास कॉरपोरेट जिओफाय प्लान बाजारात आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओफाय डिव्हाइस मोफत दिले जाते. शिवाय ३५जीबी इंटरनेट डेटा आणि दररोज १०० SMS मिळतात. हे नवीन ऑफर विशेषतः लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी (SME) तयार करण्यात आले आहे. ज्यासाठी जिओ कॉरपोरेट कनेक्टिव्हिटी मार्केटमध्ये आपली पकड वाढवू पाहत आहे.

जिओफाय डिव्हाइसच्या वैशिष्ट्यांमध्ये M2S ब्लॅक राउटर, 4G LTE सपोर्ट, १० Wi-Fi डिव्हाइस आणि १ USB डिव्हाइसचे कनेक्शन, २३००mAh बॅटरी (५-६ तास इंटरनेट वापरण्याची क्षमता), मायक्रो SD स्टोरेज व मायक्रो-USB चार्जिंग सुविधा यांचा समावेश आहे. हे डिव्हाइस 5G नसले तरीही छोट्या व्यवसायांसाठी विश्वासार्ह व पोर्टेबल 4G कनेक्शन पुरवते. तसेच, त्यात जिओकॉल, फाइल शेअरिंग आणि वन-टच WPS सेटअपसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

कॉर्पोरेट जिओफाय योजना

  • रिलायन्स जिओचा ₹२९९ चा नवीन प्लॅन यूजर्सना ३५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि २४ महिन्यांचा लॉक-इन कालावधी अशी आकर्षक सुविधा देतो.

  • रिलायन्स जिओचा ₹३४९ चा प्लॅन यूजर्सना ५० जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि १८ महिन्यांचा लॉक-इन कालावधी अशी फायदेशीर सुविधा उपलब्ध करून देतो.

  • रिलायन्स जिओचा ₹३९९ चा खास प्लॅन ग्राहकांना ६५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि १८ महिन्यांचा लॉक-इन कालावधी अशा आकर्षक सुविधांसह उपलब्ध आहे.

प्रत्येक प्लानमध्ये २००GB पर्यंत डेटा रोलओवर आणि डेटा संपल्यानंतर ६४Kbps स्पीड मिळतो. या सर्व ऑफर्समुळे जिओ व्यवसायिक ग्राहकांना स्वस्त आणि उत्तम सेवा देऊ इच्छित आहे, आणि लॉक-इन कालावधीमुळे ग्राहक दीर्घकाळ जिओशी जोडलेले राहतात.

हे नवीन प्लान सुरू केल्याने, जियो स्पर्धक कंपन्या जसे की एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देताना कठीण जाईल. कारण जिओ केवळ डेटा नाही तर हार्डवेअर, कनेक्टिव्हिटी आणि २४x७ ग्राहक सेवा दरात पुरवते. रिमोट आणि हायब्रिड वर्कच्या काळात व्यवसायांना ऑफिसच्या बाहेरही कायमस्वरूपी आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता भासत आहे आणि जिओच्या या पॅकेजमुळे ते सहज पूर्ण करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

Bigg Boss 19: अशनूर आणि अभिषेकवर बिग बॉस नाराज; 'हा' नियम तोडल्यामुळे दिली एविक्शनची शिक्षा

SCROLL FOR NEXT