Reliance Industries Saam Digital
बिझनेस

Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये नोकरकपात; तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, मोठं कारण आलं समोर

Sandeep Gawade

रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 11 टक्के नोकरकपात करण्यात आली असून तब्बल 42 हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवलं आहे. 2023-24 आर्थिक वर्षात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची कर्मचारी संख्या आता 347000 इतकी आहे. तर वर्षभरापूर्वी ही संख्या 3,89,000 इतकी होती. नव्याने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार नवीन नियुक्तींची संख्या देखील एक तृतीयांश पेक्षा जास्त 170,000 पर्यंत कमी झाली आहे. कॉस्ट-एफिशिएंसी ड्राइव आणि दुसरी म्हणजे कमी नियुक्ती. ही घसरण विशेषत: रिटेल सेक्टरमध्ये झाली आहे, जिथे कंपनीची अनेक स्टोअर बंद करण्यात आली आहेत तसंच विस्तारातही घट पहायला मिळाली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये स्वत:हून नोकरी सोडणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे कर्मचारी लाभ खर्च 3 टक्क्यांनी वाढून 25,699 कोटींवर पोहोचला आहे. ही वाढ 23 च्या तुलनेत 33 टक्के होती.

2022-23आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलने 3,300 हून अधिक नवीन स्टोअर सुरू केले होते. वर्षाच्या शेवटी शेवटी एकूण स्टोअरची संख्या 18,040 झाली आहे. कंपनीत नवीन नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत आणि नवीन व्यवसाय वाढत नाही आहेत. त्यामुळे कंपनी डिजिटल उपक्रमांद्वारे या नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीचं व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनी खर्च व्यवस्थापन आणि कार्यक्षमता चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे त्याचा अर्थ असा नाही की नवीन व्यवसाय आणि रणनिती बदलल्यामुळे नोकऱ्या निर्माण होणार नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेलच्या सेल्स टीमने खात्री केली आहे की, अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. व्यवस्थापकांव्यतिरिक्त, संचालक आणि व्हीपीच्या नोकऱ्यांना देखील फटका बसला आहे. डेल त्याच्या सेल्‍स डिवीजन मोठ्या री-ऑर्गेनाइजेशनवर काम करत आहे. या बदलामुळे डेलच्या सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एकूण 12,500 डेलच्या कर्मच्यारांना घरी बसावं लागण्याची शक्यता आहे. यामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे देखील एक कारण सांगितलं जात आहे. डेल आपल्या गो-टू-मार्केट टीमचं रीस्ट्रक्चरिंग करतं आहे. सोबतचं ग्राहकांना आणि भागधारकांसाठी नावीन्य, मूल्य आणि सेवा वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT