स्मार्टफोन उत्पादक कंपनी Realme लवकरच भारतात एक नवीन टॅबलेट लाँच करणार आहे. कंपनी हा टॅबलेट 8 मेगापिक्सेल कॅमेरासह लाँच करू शकते. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स देखील पाहायला मिळतील.
Realme Pad 3 अलीकडेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वर स्पॉट झाला आहे. येथे त्याचा मॉडेल क्रमांक RMP2402 सांगितला जात आहे. अशा परिस्थितीत Realme Pad 3 टॅबलेट लवकरच बाजारात लाँच केला जाऊ शकतो. या टॅबलेटबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही.
कमाल फीचर्स जाणून घ्या
Realme Pad 3 मध्ये 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा उपलब्ध आहे. तर हा कॅमेरा 3264×2448 रिझोल्यूशनसह सेन्सरसह येऊ शकतो. टॅबलेटचा फ्रेंट कॅमेरा 5-मेगापिक्सेल असण्याची शक्यता आहे. Realme Pad 3 देखील एक बजेट फ्रेंडली टॅबलेट असेल. या आगामी टॅबलेटमध्ये 11.52 इंच 2K LCD डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करेल. याशिवाय हा टॅबलेट MediaTek च्या Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो.
किंमत किती?
कंपनीने अद्याप किंमत जाहीर केली नाही आहे. पण असे बोले जात आहे की, Realme Pad 3 20 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा टॅबलेट बाजारात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.