RBI Plastic Notes saam tv
बिझनेस

RBI Plastic Notes : खिशातील १० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार? RBI चा मोठा प्लान समोर

New Indian Currency Notes : आरबीआय १ एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या पॉलीमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय चलन व्यवस्थेमध्ये आता महत्त्वाचा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) १ एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक म्हणजेच पॉलीमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही मूल्यांच्या प्रत्येकी १०० कोटी नोटा छापल्या जाणार असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, या नव्या नोटांचा आकार सध्याच्या कागदी नोटांप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.

प्रत्येकी १०० कोटी नोटांची चाचणी

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, RBI या प्रकल्पांतर्गत १० रुपयांच्या १०० कोटी आणि २० रुपयांच्या १०० कोटी पॉलीमर नोटा बाजारात आणून त्यांची चाचणी करणार आहे. हा फक्त प्रोयोगिक प्रकल्प (फिल्ड ट्रायल) असेल. त्यामुळे सुरुवातीला या नोटा मर्यादित स्वरुपात चलनात आणल्या जातील.

नोटांचा आकार बदलणार नसल्यामुळे बँकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण नव्या नोटांसाठी एटीएम मशीन परत कॉन्फिगर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बँकांचा जास्तीचा खर्च वाचायला मदत होईल.

प्लास्टिक नोटा आणण्यामागे काय कारण?

१० आणि २० रुपयांच्या नोटांचा वापर बाजारपेठेत सर्वात जास्त होतो. भाजीपाला खरेदी, बस - रिक्षाचं भाडं आणि किरकोळ व्यवहारांमध्ये या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सततच्या वापरामुळे कागदी नोटा लवकर फाटतात, खराब होतात किंवा भिजून निरुपयोगी ठरतात. त्यामुळे RBI ला वारंवार नव्या नोटा छापाव्या लागतात.

पॉलीमर नोटा पण जास्त टिकाऊ असतात. त्या पाणीरोधक आणि मळ प्रतिरोधक असल्यामुळे सहज खराब होत नाहीत. सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत त्यांचे आयुष्य तीन ते चार पट जास्त असू शकते. त्यामुळे भविष्यात नोटांच्या छपाईवरचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.

जुन्या नोटा बंद होणार का?

नव्या प्लास्टिक नोटांच्या चाचणीमुळे सध्याच्या १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. जुन्या नोटा आधीसारखंच वैध चलन म्हणून वापरता येतील. पॉलीमर नोटा आणि कागदी नोटा एकाच वेळी चलनात राहतील.

Health Care : पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे?

Oral Cancer Symptoms: तोंडात जखम नाही, गाठही नाही; तरीही होऊ शकतो कॅन्सरचा धोका! सुपारी खाणाऱ्यांनी ही लक्षणं ओळखा

Israel Elections: इस्रायलमध्ये राजकारण तापलं, निवडणुकीत पैसे वाटून मतं मिळवली; 'मोसाद' चौकशी करणार

Night Skin Care : वय कमी, पण चेहऱ्यावरून दिसता म्हातारे; रात्रीच्या ३ चुका ठरताहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT