October 31 Bank Holiday saam tv
बिझनेस

Bank Holiday: उद्या ३१ ऑक्टोबरला बँकेत जाण्याआधी थांबा! बँका बंद की सुरू? लगेचच घ्या जाणून

October 31 Bank Holiday: ३१ ऑक्टोबरला पाचव्या शनिवारी बँका बंद की सुरू? RBI च्या नियमांनुसार बऱ्याच शहरांमध्ये बँका सुरू राहतील.

Sakshi Sunil Jadhav

ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी बँकांमध्ये जाऊन काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी वाचा. कारण महिन्याच्या पाचव्या शनिवारी बँका बंद असतात की सुरू, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्टीच्या नियमांनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी देशातल्या बऱ्याच शहरांमध्ये बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र काही ठिकाणी स्थानिक सुट्टीमुळे बँकांच्या शाखा बंद होतील.

पाचव्या शनिवारी बँका सुरू असतात का?

RBI च्या नियमानुसार, देशातल्या बँकांना महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. तर पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार हा बँकांसाठी कामकाजाचा दिवस असतो. त्यामुळे ३१ ऑक्टोबर हा महिन्यातला पाचवा शनिवार असल्याने बऱ्याच ठिकाणी बँका सुरू राहणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यातल्या शनिवारच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहिल्यावर, ३ ऑक्टोबरला पहिल्या शनिवारी बँका सुरू होत्या. १० ऑक्टोबरला दुसरा शनिवार असल्याने बँकाना सुट्टी होती. १७ ऑक्टोबरला बँकांचं कामकाज सुरू होते, तर २४ ऑक्टोबरला चौथ्या शनिवारी बँका बंद होत्या. आता ३१ ऑक्टोबरला पाचव्या शनिवारी बँका सुरू राहतील.

अहमदाबादमध्ये बँकांना सुट्टी

RBI च्या अधिकृत सुट्टीच्या यादीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे बँकांना सुट्टी असेल मात्र, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसह इतर प्रमुख शहरांमध्ये बँकांचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. बँका बंद असल्या तरी डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले आमदार कौस्तुभ गावडे भाजप नेत्यांच्या बैठकीला

Diabetes Diet : डायबिटिस पेशंटसाठी कोणती रोटी सर्वात बेस्ट? एक्स्पर्ट्स काय सांगतात? वाचा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात २००० रुपये जमा, लगेच तुमचे नाव तपासा

दिवाळीपूर्वी एफडीएची मोठी कारवाई, पुण्यात १,३२९ किलो सुका मेवा आणि खाद्यपदार्थ जप्त

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता पार्सल थेट घरपोच मिळणार; स्टेशनवर जाण्याची कटकट संपणार

SCROLL FOR NEXT