Ashok Sahakari Bank RBI restrictions 
बिझनेस

राज्यातील या बँकेवर RBI चे कडक निर्बंध; ६ महिने सर्व व्यवहार बंद, ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ

Maharashtra Bank Crisis: अहिल्यानगरमधील अशोक सहकारी बँकेवर RBI ने २८ ऑगस्ट २०२६ पासून सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. नवीन कर्ज, नवीन ठेवी आणि खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध असून पात्र ठेवीदारांना DICGC अंतर्गत कमाल ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण लागू आहे.

Namdeo Kumbhar

Ashok Sahakari Bank RBI restrictions : राज्यात १३ शाखा असणाऱ्या श्रीरामपूर येथील नामांकित 'अशोक सहकारी बँके'वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुढील सहा महिन्यांसाठी बँकेचे सर्व वित्तीय व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बातमी वाऱ्यासारखी पसरताच आपल्या कष्टाची पुंजी काढण्यासाठी ठेवीदारांनी आणि खातेदारांनी बँकेच्या विविध शाखांसमोर मोठी गर्दी केली आहे.

बँकेवर नेमके काय निर्बंध आले आहेत?

रिझर्व्ह बँकेने लादलेल्या या निर्बंधांमुळे अशोक सहकारी बँकेला आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन कार्यालयीन खर्चाव्यतिरिक्त कोणताही मोठा व्यवहार करता येणार नाही. बँकेला नवीन कर्जवाटप करणे, इतरत्र कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे किंवा जुन्या ठेवींची रक्कम देणे यावर पुढील ६ महिन्यांसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

बँक संकटात येण्याचे नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण जमा ठेवींपेक्षा कर्जवाटपाची रक्कम अधिक झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बँकेकडे सध्या ३८० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, तर बँकेने तब्बल ४२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यात विशेषतः अहिल्यानगर येथील तीन शाखांमधून चुकीच्या पद्धतीने आणि विनाखातरजमा कर्जवाटप झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या कर्जदारांकडून वेळेत वसुली होऊ न शकल्यामुळे बँकेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून त्याचा मोठा फटका बँकेला बसला आहे.

ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार?

बँकेवर कारवाई झाल्याची माहिती मिळताच श्रीरामपूरसह इतर शाखांमध्ये खातेदारांनी पैसे काढण्यासाठी चक्रा मारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे संस्थापक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ठेवीदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

"बँकेचा परवाना रद्द झालेला नाही, त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. डिपॉझिट इन्शुरन्स (DICGC) नियमांनुसार ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना परत मिळतील," असा दावा भानुदास मुरकुटे यांनी केला आहे.

दरम्यान, अचानक लागलेल्या या निर्बंधांमुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडकले असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT