Ghee foot massage: रोज रात्री पायांच्या तळव्यांना 1 चमचा तूप लावा; फायदे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Surabhi Jayashree Jagdish

पायांना द्या आराम

दिवसभर चालणं, उभं राहणं किंवा सतत काम केल्यामुळे पायांवर ताण येऊ शकतो. अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी पायांना काही मिनिटं वेळ देणं आरामदायी ठरू शकते. पायांच्या तळव्यांना हलक्या हाताने मालिश करा.

benefits of ghee on feet | saam tv

पायांची मालिश करा

रात्री झोपण्यापूर्वी पायांची हलक्या हाताने मालिश केल्याने शरीराला निवांत होण्यास मदत होऊ शकतं. तूप वापरून केलेली मालिश पायांच्या त्वचेला आराम देते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही मिनिटे पायांची मालिश करणं ही फायद्याचं ठरू शकते.

ghee foot massage at night | saam tv

पायांचा थकवा कमी होण्यास मदत

दिवसभर चालणं किंवा उभं राहिल्यामुळे पायांच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. अशावेळी पायांच्या तळव्यांना थोडं तूप लावून काही मिनिटं हलक्या हाताने मालिश केल्यास आरामदायी अनुभव मिळू शकतो.

foot massage before sleeping | saam tv

झोपण्यापूर्वी मिळतो आराम

पायांना मालिश केल्यामुळे झोपण्यापूर्वी शरीराला निवांत वाटतं. तुपाचा वापर करून पायांच्या तळव्यांवर हलक्या हाताने मालिश केल्यास पायांना मऊपणा आणि आरामदायी स्पर्श मिळतो.

ghee for dry feet | saam tv

कोरड्या आणि फुटलेल्या टाचांसाठी फायदेशीर

तुपातील स्निग्ध घटक त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे पायांची त्वचा कोरडी किंवा खरखरीत असल्यास रात्री तूप लावल्याने त्वचा मऊ होण्यास मदत होऊ शकते.

ghee for cracked heels | saam tv

पायांमधील जडपणा कमी होतो

दिवसभराच्या कामानंतर पाय जड वाटत असल्यास काही मिनिटांची हलकी मालिश आराम देऊ शकते. तूप हे पायांच्या मालिशसाठी पारंपरिक पद्धतीने वापरले जाणारं स्निग्ध माध्यम आहे. पायांना हलक्या हाताने चोळल्यामुळे उबदार आणि आरामदायी अनुभव मिळू शकतो.

ghee for skin moisturising | saam tv

किती तूप लावावं?

पायांच्या तळव्यांसाठी मोठ्या प्रमाणात तूप लावण्याची गरज नसते. साधारण एक चमचा तूप दोन्ही पायांसाठी पुरेसं ठरू शकतं. तूप पायांच्या तळव्यांवर आणि टाचांवर पसरवून हलक्या हाताने मालिश करावी.

tired feet relief

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Cinnamon benefits | saam tv
येथे क्लिक करा