RBI Repo Rate Saam tv
बिझनेस

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो रेट स्थिर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

RBI Repo Rate Unchanged Big Annoucement: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट स्थिर असणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

रेपो रेटमध्ये बदल नाही

कर्जाचा हप्ता तसाच राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने पतधोरण बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट स्थिर आहे. पुढच्या दोन महिन्यांसाठी रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेपो रेट ५.२५ टक्के स्थिर ठेवण्यात आला आहे. यामुळे कर्जदारांना सध्या तरी कोणताही दिलासा मिळाला नाही. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रेपो रेटमध्ये बदल नाही (RBI Repo Rate Unchanged)

भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होती. दोन दिवसांपासून ही बैठक सुरु होती. आज ८ एप्रिल रोजी रेपो रेटची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणे खूप आव्हानात्मक होते.

कर्जाचा हप्ता वाढणार नाही (Interest Rate Will Not Increase)

दर दोन महिन्यांनी रिझर्व्ह बँकेची बैठक होते. यामध्ये रेपो रेटमध्ये बदल करायचा की नाही हे ठरवले जाते. रेपो रेटवर आधारित बँकांच्या कर्जाचे व्याजदर ठरते. दरम्यान, आता रेपो रेटमध्ये बदल न झाल्याने व्याजदरातदेखील काही बदल होणार नाहीये. तुमच्या कर्जाचे व्याज तसेच राहणार आहे. त्यामुळे तुमचा ईएमआय कमी होणार नाहीये. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा हप्ता तसाच सुरु राहणार आहे. या रेपो रेटवर तुमचा ईएमआय किती वाढणार की कमी होणार हे समजते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली? फेकून देऊ नका, 'या' सोप्या ट्रिकने घालवा कडवटपणा

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Maharashtra News Live Update: पुणे नाशिक महामार्गावर तिरंगा हातात घेत चार तरुणांचे आंदोलन

Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

आषाढी एकादशीसाठी उपवासाला बनवा चविष्ट शेंगदाण्याचे लाडू, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT