रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटची वाढ
रेपो रेट बदलाचा होम लोन ईएमआयवर परिणाम होणार
कार लोन आणि पर्सनल लोन देखील वाढणार
फ्लोटिंग रेट कर्जाचा ईएमआय बदलणार
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयने आज रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे देशभरातील लाखो कर्जदारांचे संपूर्ण बजेट कोलमडू शकते. फेब्रुवारी २०२३ नंतर पहिल्यांदाच आरबीआयने रेपो रेट ५.५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे . आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील मौद्रिक धोरण समितीच्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आता नवीन कर्जदार आणि विद्यमान कर्जदार या दोघांसाठीही गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे पैसे देखील वाढणार आहेत.
ज्या ग्राहकांनी फ्लोटिंग दरांवर गृह, वाहन किंवा वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्यांच्या ईएमआयमध्ये किंवा कर्जाच्या कालावधीत वाढ होऊ शकते. जर बँकांनी रेपो रेटमधील संपूर्ण ०.२५ टक्के वाढ ग्राहकांवर लादली तर तुमच्या ईएमआयची रक्कम वाढेल. अनेक प्रकरणांमध्ये बँका तुमच्या ईएमआयची रक्कम बदलत नाहीत पण तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवतात. याचा अर्थ तुम्हाला जास्त महिने ईएमआय भरावा लागेल. मात्र, ज्या ग्राहकांनी निश्चित दरांवर कर्ज घेतले आहे त्यांच्यावर या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नाही.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, जून अखेरपर्यंत बँकांच्या एकूण फ्लोटिंग रेट रुपया कर्जांपैकी सुमारे ६८.२ टक्के कर्ज बाह्य बेंचमार्क (EBLR) शी जोडलेली होती. रेपो रेट-संबंधित कर्जाबद्दल सांगायचे झाले तर, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकांना बाह्य बेंचमार्कशी निगडित कर्ज दरांमध्ये दर ३ महिन्यांतून किमान एकदा सुधारणा करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील रीसेट तारखेला रेपो रेट- संबंधित गृह आणि वैयक्तिक कर्जाचे दर तात्काळ वाढतील.
MCLR-संबंधित कर्जाबाबत सांगायचे झाले तर, अंदाजे २९.६% कर्ज बँकेच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) शी जोडलेली आहेत. यामध्ये MSME आणि कॉर्पोरेट कर्जांचा समावेश आहे. या कर्जांवरील परिणाम थोड्या विलंबाने ग्राहकांना जाणवले. कारण बँका त्यांच्या निधी खर्चाचा आढावा घेतल्यानंतरच करारानुसार नमूद केलेल्या रीसेट तारखेला दर बदलतील. त्यामुळे या ग्राहकांना काहीसा दिलासा राहिल.
दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ७.२५ टक्क्यांपासून गृहकर्ज देते. तर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदर आणि बदलांची वेळ त्यांच्या कर्ज कराराच्या अटींवर अवलंबून असेल. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, सध्या दर कपातीची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे या दसरा किंवादिवाळीच्या काळात घर किंवा वाहन खरेदी करण्याचा प्लान करत असलेल्यांना जास्त व्याजदर आणि जास्त ईएमआयसाठी तयार राहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.