RBI Saam Tv
बिझनेस

Repo Rate: RBI देणार खुशखबर! रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात होण्याची शक्यता, कर्ज स्वस्त होणार

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आरबीआय कदाचित रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जावरील ईएमआयदेखील कमी होणार आहे.

Siddhi Hande

RBI सर्वसामान्यांना दिलासा देणार

रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता

रेपो रेट ५.५ टक्के होण्याची शक्यता

डिसेंबर महिना सुरु झाला आहे. डिसेंबर महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियम बदलले आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.होम लोन, कार लोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, महागाई कमी झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे लोनचा ईएमआय आपोआप कमी होईल.

५ डिसेंबरला होणार मोठी घोषणा

आरबीआयची पतधोरण बैठक ३ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ३ दिवस ही बैठक असणार आहे. या रेपो रेटबाबतची घोषणा ५ डिसेंबर म्हणजे शुक्रवारी होऊ शकते. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ५ डिसेंबरला सकाळी घोषणा करु शकतात.

रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षभरात रेपो रेट १०० बेसिस पॉइंट्सने कपात केला होता. यानंतर आतादेखील २५ बेसिस पॉइंट्सने कपात होऊ शकते. यामुळे रेपो रेट ५. ५ टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

महागाई नियंत्रणात

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई ही सरकारने निर्धारित केल्यापेक्षा २ टक्के कमी होऊ शकतात. महागाई कमी झाल्यामुळे रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.याचसोबत जीएसटीमुळेही महागाई आवाक्यात आली आहे. यामुळेदेखील रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. जीडीपीमध्ये वाढ होत आहे, हेदेखील रेपो रेट कमी होण्याचे कारण असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरलं! पुरूषाचं विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध; लग्नासाठी हट्ट करताच जिवंत जाळलं, शेवटी पुरावा मागे सुटला

Maharashtra Live News Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर पुन्हा चाहत्यांची गर्दी; बिग बी झाले भावुक म्हणाले, 'मला जगण्याची प्रेरणा...'

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाने महत्त्वाचा टप्पा गाठला, प्रवासी चाचणी यशस्वी! ख्रिसमसला स्वप्न सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT