RBI Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतचे. त्यामुळे रोपे रेट कमी होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक

रेपो रेट कमी होणार का?

कर्जदारांना दिलासा मिळणार की नाही?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन आर्थिक वर्षातील पहिली पतधोरण बैठक घेणार आहे. २०२६-२७ मधील ही पहिली बैठक असणार आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार की नाही हे कळणार आहे. रेपो रेटवर ईएमआय अवलंबून असतो. रेपो रेट कमी झाल्यावर आपोआप कर्जाचा हप्ता कमी होतो.

रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक सोमवार ६ एप्रिलपासून सुरु झाली आहे. दरम्यान,या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा ८ एप्रिल म्हणजे उद्या होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षभरात एकूण सहा वेळा बैठका घेते. दर दोन महिन्यांनी ही बैठक होते. याच बैठकीवर पुढच्या महिन्यासाठीच्या पैशांसंबंधित अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर लोनचे व्याजदर अवलंबून असते. त्यामुळे यावेळी रेपो रेटमध्ये काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, यावेळी रेपो रेटमध्ये काहीच बदल होणार नाही.ICRA चे चीफ इकोनॉमिस्ट आदिती नायर यांनी सांगितले की, सध्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक पातळीवरील गोष्टींमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल न होण्याची शक्यता जास्त आहे.

SBIचे चीफ इकोनॉमिस्ट सौम्य कांति घोष यांच्या मते, जागतिक पातळीवरील युद्धाचा परिणाम भारतावर होत आहे. रुपयाची किंमत घसरत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरपेक्षा जास्त आहे.यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे रेपो रेटकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT