दिवाळीच्या तोंडावर आरबीआयकडून (Reserve Bank of India) गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा ठेवून 'पॉझिटिव्ह' निर्णयाची आस लावून बसलेल्या कोट्यवधी कर्जधारकांना कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. आरबीआयने पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रेपो रेट ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याची घोषणा केली. रेपो रेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न झाल्याने एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना फिक्स्ड डिपॉझिटवर (मुदत ठेवी) अधिक व्याजदर मिळणार आहे. मात्र, कर्जदारांना कोणतीही गोड बातमी मिळू शकलेली नाही. (Latest News)
मे २०२२ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने एकूण २.५ टक्क्यांपर्यंत रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यानंतर मात्र ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर बहुतांश बँका एफडी योजनांवर अधिक व्याजदर देत आहेत. हे दर मागील तीन-चार वर्षांतील सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आरबीआयच्या या निर्णयानंतर ग्राहकांना दोन ते तीन वर्षे कालावधीच्या एफडीवर अधिक व्याजदराचा लाभ मिळत राहणार आहे. रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न केल्याने यापुढील काळातही या एफडी योजनांवर अधिक व्याजदर मिळण्याची शक्यता आहे.
आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कर्जदारांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळू शकला नाही. सण-उत्सवाच्या काळात घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर, सध्यातरी ज्यादा व्याजदराने कर्ज घ्यावा लागणार आहे. मे २०२२ मध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली होती. तेव्हापासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये २.५० टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. या वाढीचा परिणाम थेट कर्जधारकांवर झाला आहे. यंदाच्या सण-उत्सवांच्या काळातही कर्जदारांवरील हा भार हलका होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.