रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेट (Repo Rate) कमी करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉइंट्सने कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६ टक्के आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्जावरील व्याजदर आपोआप कमी होणार आहे. यामुळे तुम्हाला कर्जाचा ईएमआय कमी भरावा लागणार आहे.
रेपो रेटच्या कपातीनंतरे सेंट्रल बँकेनेही २५ बेसिस पॉइंटने कपता केली आहे. यानंतर इतर बँकानी लवकरच व्याजदर कमी करतील. रेपो रेट ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी केला तर कर्जाचा ईएमआय किती कमी होणार याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
रेपो रेट कमी झाल्याने घराचा EMI कितीने कमी होणार? (How Much Home loan EMI Decrease)
तुमच्या कर्जाचा हप्ता किती कमी होणार याबाबर राऊल कपूर, (Co-CEO, Andromeda Sales and Distribution Pvt Ltd)याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी कर्जाचा हप्ता किती कमी होणार यामुळे ईएमआय कितीने कमी होणार याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
जर तुमचे २० वर्षांसाठी गृहकर्ज असेल आणि तुमचे सध्याचे व्याजदर ९ टक्के असेल तर त्यात ०.५० टक्क्यांनी कपात होईल. म्हणजे तुमचे व्याजदर ८.५ टक्के होईल. यामुळे तुमचे महिन्याला १००० ते ६००० रुपये वाचणार आहेत.
३० लाखांवर EMI
जर तुमच्या कर्जाची रक्कम ३ लाख रुपये असेल तर त्यावर ९ टक्क्याच्या हिशोबाने सध्या तुम्ही २६,२४७ रुपये ईएमआय भरत आहात. यात आता ईएमआय कमी होणार आहे. तुम्ही महिन्याला १,१७६ रुपयांची बचत करु शकणार आहे. त्यामुळे पुढच्या २० वर्षात २.८२ लाखांची बचत तुम्ही करु शकतात.
५० लाखांवर EMI
जर तुमच्या कर्जाची रक्कम ५० लाख असेल तर सध्या EMI ४३,७४५ रुपये आहे. तर तो ईएमआय आता ४१,७८५ होणार आहे. त्यामुळे तुमची महिन्याला १,९६० रुपये बचत होणार आहे. यामुळे ४.७० लाखांची बचत होणार आहे.
७० लाखांवर EMI
७० लाखांवर तुम्ही ९ टक्क्याने ६१,२४३ रुपये EMI भरतात. तर तो हप्ता आता ५८,४९९ रुपये होणार आहे. त्यामुळे तुमची ६.५८ लाख रुपयांची बचत होणार आहे.
१ कोटी कर्जावर EMI
तुम्ही ९ टक्के व्याजदराने सध्या ८७,४९० रुपये EMI भरत आहात. हा EMI आता ८३,५७० रुपये होणार आहे. त्यामुळे महिन्याला ३,९२० रुपये EMI होणार आहे.
१.५ कोटींच्या कर्जावर EMI
१.५ कोटींवर १,३१,२३५ रुपये EMI भरावा लागतो. तर आता या ईएमआयमध्ये ५,८८० रुपयांनी बचत होणार आहे. तुम्हाला महिन्याला १,२५,३५५ रुपये EMI भरावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.