500 Note Saam TV
बिझनेस

Rs 500 note News : तुमच्या खिशातील ५०० रुपयांची नोट बनावट? सरकारने व्हायरल मेसेजबाबत दिली महत्त्वाची माहिती

Rs 500 note Fact Check : ५०० रुपयांच्या नोटेबाबत असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Fact Check : सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत असतात. काही मेसेज माहितीपूर्ण असतात तर काही आपली चिंता वाढवणारे असतात. मात्र काही खोट्या मेसेजेसमुळे लोकांना नाहक त्रासालाही सामोरे जावं लागतं. ५०० रुपयांच्या नोटेबाबत असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, स्टार (*) चिन्ह असलेली ५०० रुपयांची नोट बनावट असून ती चालणार नाही. यावर, रिझर्व्ह बँकेने गुरुवारी अशा नोटांच्या वैधतेबद्दल लोकांच्या चिंता दूर केली आहे.

आरबीआयने सांगितले की, हे चिन्ह बॅंकनोटच्या नंबर पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे, ज्याचा वापर क्रमवार क्रमांक असलेल्या 100 च्या पॅकेटमध्ये सदोष प्रिंट नोटांसाठी बदलण्यासाठी केला जातो.

याशिवाय पीबीआय फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, तुमच्याकडे स्टार (*) असेल तर घाबरू नका. अशा नोटा बनावट असल्याचा दावा करणारे मेसेज फेक आहेत. आरबीआयने डिसेंबर २०१६ पासून नवीन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये स्टार (*) चिन्ह सादर केले.

स्टार चिन्ह कशासाठी?

आरबीआयच्या मते, अशा नोटेवर स्टार चिन्ह लागू केले जाते, जी चुकीची छापलेली नोट किंवा काही चुकीमुळे निरुपयोगी झालेली नोट बदलते. अनुक्रमांक असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीने छापलेल्या नोटांच्या बदल्यात तारांकित चिन्ह असलेल्या नोटा जारी केल्या जातात. (Finance News)

त्याचा उद्देश नोटांची छपाई सुलभ करणे आणि खर्च कमी करणे हा होता. यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँक चुकीच्या छापील नोटा बदलून त्याच क्रमांकाच्या योग्य नोटा देत असे. मात्र, नवीन नोट छापेपर्यंत संपूर्ण बॅच वेगळी ठेवण्यात आली होती, त्यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही वाढले होते. यामुळे स्टार चिन्हाची पद्धत लागू करण्यात आली, ज्यामुळे खराब झालेली नोट त्वरित बदलली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT