Mahabharata: भगवान श्रीकृष्ण यांनी कोणाला दिला होता दुर्गंधी येण्याचा श्राप?

Surabhi Jayashree Jagdish

शाप

महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामाने केलेल्या एका भयंकर कृत्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला कठोर शाप दिला होता. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आणि कौरवांच्या बाजूने लढणारा पराक्रमी योद्धा होता. युद्ध संपल्यानंतर त्याने रात्री पांडवांच्या छावणीवर हल्ला करून झोपलेल्या योद्ध्यांची आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या केली.

Mahabharata story | saam tv

अश्वत्थामा कोण होता?

अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र होता आणि त्याला लहानपणापासूनच युद्धकलेचं तसंच विविध दिव्य अस्त्रांचं ज्ञान मिळालं होतं. महाभारताच्या युद्धात त्याने कौरवांच्या बाजूने लढत पांडवांविरुद्ध अनेक युद्धं केली.

Ashwatthama punishment | saam tv

रात्री पांडवांच्या छावणीवर हल्ला

दुर्योधनाच्या अवस्थेमुळे संतप्त झालेल्या अश्वत्थामाने रात्री पांडवांच्या छावणीत प्रवेश केला. त्या वेळी अनेक योद्धे झोपेत असताना त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांचीही हत्या केली. युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन झोपलेल्या योद्ध्यांवर हल्ला केल्यामुळे त्याच्या या कृत्याला अत्यंत अधर्माचं कृत्य मानलं गेलं.

Ashwatthama immortality | saam tv

पांडवांनी अश्वत्थामाचा पाठलाग केला

छावणीतील हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर पांडवांनी अश्वत्थामाचा शोध सुरू केला. तो ऋषी व्यासांच्या आश्रमाजवळ असल्याचं समजल्यानंतर पांडव आणि श्रीकृष्ण त्याच्यापर्यंत पोहोचले. स्वतःचा बचाव करण्यासाठी अश्वत्थामाने अत्यंत शक्तिशाली ब्रह्मशिर अस्त्राचा प्रयोग केला, ज्याला रोखण्यासाठी अर्जुनानेही त्याच प्रकारचं अस्त्र सोडलं.

Ashwatthama curse story | saam tv

न जन्मलेल्या परीक्षिताला लक्ष्य केलं

ऋषी व्यास आणि नारद यांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही अस्त्रांची भयंकर टक्कर टाळण्यात आली. अर्जुनाला आपले अस्त्र परत घेता आलं, मात्र अश्वत्थामाला ते परत घेण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे त्याने ते अस्त्र उत्तरेच्या गर्भाकडे वळवले, कारण त्या गर्भात पांडव वंशाचा पुढील वारस परीक्षित वाढत होता.

Krishna and Ashwatthama | saam tv

श्रीकृष्णांनी परीक्षिताचं रक्षण केलं

अश्वत्थामाच्या अस्त्रामुळे उत्तरेच्या गर्भातील बाळाला धोका निर्माण झाला, परंतु श्रीकृष्णांनी परीक्षिताचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं. अस्त्राचा परिणाम झाल्यानंतरही परीक्षित जिवंत राहील आणि पुढे कुरुवंशाचा राजा बनेल, असे श्रीकृष्णांनी सांगितलं. अश्वत्थामाच्या कृत्याला शिक्षा देताना श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या पापांचं फळ भोगावं लागेल, असं स्पष्ट केलं.

Dronacharya son Ashwatthama | saam tv

अश्वत्थामाला दुर्गंधी येण्याचा शाप

श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला ३,००० वर्षे पृथ्वीवर एकट्याने भटकत राहण्याचा शाप दिला. त्याच्या शरीरातून पू आणि रक्ताचा दुर्गंध येत राहील, तो विविध आजारांनी त्रस्त राहील आणि त्याला माणसांमध्ये स्थान मिळणार नाही, असं शापात सांगितलंय.

Ashwatthama after Mahabharata | saam tv

शापानंतर अश्वत्थामाचे काय झाले?

श्रीकृष्णांचा शाप ऐकल्यानंतर अश्वत्थामाने आपल्या कपाळावरील दिव्य मणी पांडवांना दिला आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर तो एकाकीपणे भटकत राहील आणि त्याला सामान्य माणसांप्रमाणे समाजात राहता येणार नाही, अशी शापाची अट होती.

Mahabharata war | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Belly button oiling | saam tv
येथे क्लिक करा