Peri Peri French Fries Recipe: रेस्टॉरंटस्टाईल कुरकुरीत पेरी-पेरी फ्रेंच फ्राईज बनवा घरच्या घरी;वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

बटाटे निवडा

परफेक्ट फ्रेंच फ्राइजसाठी मोठे आणि ताजे बटाटे घ्या. बटाटे सोलून त्यांचे लांब आणि समान आकाराचे काप करा.

Peri Peri French Fries Recipe

पाण्यात भिजवा

कापलेले बटाटे थंड पाण्यात २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे बटाट्यांमधील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि फ्राइज अधिक कुरकुरीत होतात.

Peri Peri French Fries Recipe

बटाटे व्यवस्थित कोरडे करा

पाण्यातून बटाटे काढून स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने पूर्णपणे कोरडे करा. बटाट्यांवर पाणी राहिल्यास तळताना तेल उडू शकते.

French Fries Recipe | yandex

फ्राइज तळून घ्या

कढईत तेल गरम करून बटाट्यांचे काप मध्यम आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत तळा. पहिल्या तळणीनंतर ते बाहेर काढून काही मिनिटे थंड होऊ द्या.

French fries Recipe | yandex

पुन्हा फ्राइज तळा

फ्राइज पुन्हा गरम तेलात टाकून कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा. यामुळे फ्राइज बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ राहतात.

French Fries Recipe | Saam Tv

Peri Peri मसाला तयार करा

एका भांड्यात पेरी पेरी मसाला, लाल तिखट, लसूण पावडर, थोडे मीठ आणि चाट मसाला एकत्र करा. तिखटपणा आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

French Fries Recipe | Yandex

मसाला मिक्स करून सर्व्ह करा

गरम फ्राइज एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यावर तयार केलेला पेरी पेरी मसाला टाका. बाऊल हलके हलवून मसाला सर्व फ्राइजना व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या आणि लगेच सर्व्ह करा.

French Fries Recipe | Saam Tv

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

Pooja Sawant
येथे क्लिक करा