LIC Aadhaar Shila Plan: महिलांनी लक्ष द्या! LIC च्या 'या' योजनेत 87 रुपये गुंतवा, तुम्हाला मिळतील पूर्ण 11 लाख रुपये

Lic Scheme: महिलांनी लक्ष द्या! LIC च्या 'या' योजनेत 87 रुपये गुंतवा, तुम्हाला मिळतील पूर्ण 11 लाख रुपये
LIC Aadhaar Shila Plan
LIC Aadhaar Shila PlanSaam TV
Published On

LIC Aadhaar Shila Plan: देशात सरकार महिलांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहे. याशिवाय महिला स्वतः आपली बचत चांगल्या योजनेत गुंतवून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. यातच माहितीच्या कमतरतेमुळे अनेक महिला त्यांच्या बचतीची रक्कम चुकीच्या योजनांमध्ये गुंतवत आहेत.

यातच आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव 'आधार शिला योजना' आहे. देशातील मोठ्या संख्येने लोक एलआयसीकडे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहतात. या कारणास्तव, इतर कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी, बहुतेक लोक त्यांचे पैसे एलआयसीमध्ये गुंतवतात. या गुंतवणुकीचे गणित समजून घेऊया, ज्यामध्ये तुम्ही फक्त 87 रुपये गुंतवून 11 लाख रुपये मिळवू शकता.

LIC Aadhaar Shila Plan
EPFO Rules: पगारातून पैसे कापले, पण कंपनीने PF जमा केला नाही; कर्मचारी येथे करू शकतात तक्रार...

यासाठी तुम्हाला दररोज 87 रुपये वाचवावे लागतील. अशातच एका वर्षात तुमच्याकडे एकूण 31,755 रुपये जमा होतील. तुम्ही एलआयसी आधारशिला योजनेत सतत दहा वर्षे गुंतवणूक करत असाल. यातच तुमचे एकूण 3,17,550 रुपये स्कीममध्ये जमा होतील.  (Latest Marathi News)

एलआयसी आधार शिला योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 70 वर्षे आहे. अशा परिस्थितीत या योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी सुमारे 11 लाख रुपये जमा करू शकता. 8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

LIC Aadhaar Shila Plan
PM Matru Vandana Yojana: महिलांसाठी आहे 'ही' योजना, सरकार देतेय 6000 रुपये; कसा घ्यायचा लाभ, जाणून घ्या...

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये किमान विमा रक्कम 75 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर कमाल विमा रक्कम 3 लाख रुपये आहे. या योजनेची किमान पॉलिसी मुदत 10 वर्षे आहे. ज्यामध्ये कमाल 20 वर्षे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय एलआयसीच्या या योजनेत इतरही अनेक उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. महिलांना त्यांचे पैसे चांगल्या योजनेत गुंतवायचे असतील तर. अशा परिस्थितीत ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com