ITR News : टॅक्स वाचवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका, अन्यथा २०० टक्क्यांच्या भुर्दंड भरावा लागेल

ITR Filing : कर चुकवण्यासाठी बनावट घरभाडे पावत्या किंवा देणग्यांबाबत बनावट पावत्या वापरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
ITR Filing
ITR FilingSaam Tv
Published On

ITR Filing Last Date : आयटीआर(ITR) अर्ज दाखल करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अचूक माहिती भरणे हे अनिवार्य आहे. दरम्यान कर चुकवण्यासाठी बनावट घरभाडे पावत्या किंवा देणग्यांबाबत बनावट पावत्या वापरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे या चुका करु नका.

आयटीआर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. आयटीआर अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले आहे. त्यामुळे तुम्ही आयटीआर भरला नसेल तर लगेच भरा. मुदतीनंतर जर तुम्ही आयटीआर भरला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

ITR Filing
Income Tax department Raid: यशवंत जाधव यांच्या घरी सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच

आयटीआर भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती वापरु नका. कर वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बनावट कागदपत्रे वापरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी प्रप्तिकर विभागाने प्रयत्न वाढवले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) नियमांनुसार, पगारदार व्यक्ती त्याच्या घरमालकाचा पॅन जाहीर न करता घरभाड्यावर १ लाखांपर्यंत सूट मिळवू शकतो. परंतु त्यावरील अधिक घरभाड्यासाठी घरमालकाचा पॅनकार्ड सादर करणे आवश्यक आहे.

ITR Filing
Dr. Ambedkar Foundation Scheme: लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे योजना...

काही करदाते याचा गैरवापर करतात. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने त्यांना नोटीस पाठवून पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. जर या कागदपत्रांमध्ये काहीही संशयास्पद आढळल्यास प्राप्तिकर विभाग नोटीस बजावू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने कर वाचवण्यासाठी कमी उतपन्न दाखवले तर त्याच्यावर २००% पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

या अडचणी टाळण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या सर्व नियमांचे पालन करा. घरभाड्याच्या कराचे लेखी करार करा. शक्यतो, ऑनलाईन पेमेंटचा उपयोग करा. याचबरोबर १ लाख रुपयांपेक्षा जास्त घरभाडे असेल तर घरमालकाचा पॅनदेखील नमूद करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com