RBI MPC Meeting, Cash Deposit
RBI MPC Meeting, Cash Deposit Saam Tv
बिझनेस

UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय

कोमल दामुद्रे

Deposit Cash Through UPI :

पैसे बँकेत जमा करण्यासाठी आपण लांबलचक रांगेत उभे राहतो. तसेच बँकेच्या या प्रोसेसमुळे आपल्याला भयंकर वैताग येतो. परंतु, येत्या पैसे जमा करण्यासाठी लांब लचक रांगेसोबत डेबिट कार्डची गरज भासणार नाही.

शुक्रवारी ५ एप्रिलला भारतीय रिझर्व्ह बँकेचे शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआय लवकरच ग्राहकांसाठी UPI द्वारे रोख रक्कम बँकेत (Bank) जमा करण्याची सुविधा सुरु करु शकते. नवीन आर्थिक धोरणादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपण सध्या यूपीआयच्या माध्यामातून एटीएमद्वारे पैसे काढतो.परंतु, यापुढे कोणत्याही बँकेत जाऊन एटीएममधील कॅशलेस सुविधेचा वापर करुन लगेच पैसे काढू शकता.

1. पतधोरण बैठकीत काय ठरले?

चालू आर्थिक वर्षाचा पहिला द्विमासिक चलनविषयक धोरणाचा आढावा सादर करताना आरबीआयचे (RBI) गर्व्हनर शक्तीकांत दास म्हणाले की, एटीएममध्ये यूपीआयचा वापर करुन कार्डलेस पैसे काढता येत आहे. पण लवकरच यूपीआय वापरुन कॅश डिपॉझिट करता येणार आहे.

2. ही सुविधा कधीपासून सुरु होणार?

सध्या आरबीआयने कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्याची घोषणा केली आहे. परंतु, ही सुविधा कधीपासून सुरु होणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

3. रोख रक्कम बाळगण्यापासून स्वातंत्र्य

युपीआयची ही सुविधा सुरु झाल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. यामध्ये तुम्हाला स्कॅन करुन पैसे जमा करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT