RBI Action Shirpur Merchant Bank
RBI Action Shirpur Merchant Bank Saam Tv
बिझनेस

RBI:आरबीआयची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर ६ महिने बंदी

Rohini Gudaghe

सुनील काळे साम टीव्ही, मुंबई

RBI Action Shirpur Merchant Bank Transactions Bans

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) राज्यातील एका मोठ्या बॅंकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट बँकेवर (Shirpur Merchant Bank) कारवाई केली आहे. आता सहा महिने या बॅंकेच्या व्यवहारांवर बंदी असणार आहे. त्यामुळे संबंधित बॅंकेच्या ग्राहकांना या बॅंकेतून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.  (Latest Marathi News)

आरबीआयने या बॅंकेवर कारवाई का केली, असा प्रश्न समोर येत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर सहा महिने बंदी असणार आहे. कर्ज देणे किंवा ठेवी घेण्यावर बंदी (RBI Action Shirpur Merchant Bank) असणार आहेत. ठेवीदार सहा महिन्यांसाठी पैसेही काढू शकत नाही, त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांनी या गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आता बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार (Shirpur Merchant Bank Transactions Bans) आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक निर्णय घेतले आहेत.

आरबीआयने या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर निर्बंध घातले आहेत. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही सहकारी बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार (Bank Transactions Ban) नाही, असं आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

८ एप्रिल २०२४ पासून शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिने लागू राहतील. मात्र, या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं ( Business News) आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

येस बँकेचे ४०० कोटींची फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी अजीत मेननला केरळमधून अटक करण्यात आली (Utility News) आहे. तीन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखा आरोपीच्या मागावर होती.आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी आहे. मेनन विरोधात लूक आउट सर्क्युलर बजावण्यात आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Crime News : सोबत फिरायला आली नाही; बहिणीच्या समोरच तरुणीला नराधमानं क्रूरपणे संपवलं

Pune Crime: कुख्यात गुन्हेगार हिरव्या, डड्याचा राडा; घरात घुसून एका कुटुंबाला दिली जिवे मारण्याची धमकी

Solapur Loksabha: प्रणिती शिंदे की राम सातपुते; विजयी गुलाल कोण उधळणार? मनसे- शरद पवार गटात लागली १ लाखाची पैज!

Kidney Problem: चेहऱ्यावर 'ही' लक्षण दिसल्यास त्वरीत उपचार घ्या; तुम्हाला 'हा' गंभीर आजार असू शकतो

French Fries: रेस्टॉरंटसारखे चटपटीत; घरच्या घरी बनवा फ्रेंच फ्राईज

SCROLL FOR NEXT