Ration Card Google
बिझनेस

Ration Card: २४ तासांत हे काम कराच अन्यथा तुमचे रेशनकार्ड होईल बंद; मिळणार नाही मोफत धान्य

Ration Card KYC Last Date Today: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर केवायसी केले नसेल तर आजच करुन घ्या. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन तुम्ही धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात.

देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच हे काम करा.

केवायसी करण्याची शेवटची तारीख

केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी (KYC) करणे अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने अंतिम मुदत आधीच दिली होती. मात्र, ही मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. तर जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही केवायसी करावे.

ई-केवायसी करण्याची प्रोसेस (Ration Card KYC Process)

रेशन कार्डधारक फक्त आजपर्यंतच ई केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल. रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही बायोमॅट्रिक करु शकतात. बायोमॅट्रिक करुन तुम्ही केवायसी पूर्ण करु शकतात. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे आहे.

रेशन कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नारंगी, पांढरे असे रेशन कार्ड असतात. हे रेशन कार्ड नागरिकांच्या उत्पन्नानुसार त्यांना दिले जातात. त्यानुसारच त्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. त्यांचे उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांना मोफत रेशन कार्ड मिळत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT