Ration Card Google
बिझनेस

Ration Card KYC: कामाची बातमी! १५ दिवसांत हे काम कराच, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

Ration Card KYC Process: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केले नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे. यासाठी शेवटची तारीख ३० एप्रिल देण्यात आली आहे.

Siddhi Hande

भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र असते. रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्न-धान्य मिळते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत चांगले धान्य मिळावे, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. दरम्यान, आता रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

रेशन कार्ड केवायसी (Ration Card KYC) करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती. मात्र, ही तारीख आता वाढवून ३० एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे या १५ दिवसांत तुम्हाला केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होईल.

लाखो नागरिकांनी केले नाही केवायसी

देशभरात लाखो नागरिकांनी रेशन कार्ड केवायसी केलेले नाही. त्यामुळेच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड केवायसी केल्यानंतर त्या कार्डधारकाची ओळख पटते. त्यामुळे रेशन कार्डवरुन होणाऱ्या फसवणूकीला आळा बसणार आहे.

रेशन कार्ड केवायसीची प्रोसेस (Ration Card KYC Process)

तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केवयासी करु शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने केवायसी करु शकतात.

ऑनलाइन पद्धत (Ration Card KYC Online Process )

तुम्हाला मेरा केवायसी आणि आधार फेस आरडी हा अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुमचे राज्य निवडायचे आहे.

आधार नंबर टाकायला आहे. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT