Rajiv Yuva Scheme Saam Tv
बिझनेस

Rajiv Yuva Scheme: स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देतंय ४ लाखांचे लोन; राजीव युवा योजना नक्की आहे तरी काय?

Rajiv Yuva Scheme For Business: तेलंगणा राज्य सरकारने तरुणांसाठी खास राजीव युवा योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला ४ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते.

Siddhi Hande

स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय आपण कोणताही व्यवसाय सुरु करु शकत नाही. त्यामुळेच बिझनेससाठी लोन घेतले जाते. यासाठीच सरकारने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ४ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते.

तेलंगणा सरकारने राजीव युवा विकास योजना २०२५ सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ही योजना अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गासाठी हे लोन दिले जाते.

राजीव युवा सरकारी योजना (Rajiv Yuva Scheme)

राजीव युवा योजनेत तुम्हाला ४ लाखांचे लोन दिले जाते. या लोनवर तुम्हाला खूप कमी व्याज मिळते. या योजनेत पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याच वयोगटातील तरुणांना हे लोन मिळणार आहे. ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. शहरी भागातील अर्जदाराचे उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असावे.

या योजनेत २१ ते ५५ वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. शेती किंवा संबंधित कामांमध्ये काम करत असलेले नागरिक ६० वर्षापर्यंत अर्ज करु शकतात. या योजनेत अर्ज करताना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.

या योजनेत सर्वात आधी प्राधान्य महिला दिव्यांग व्यक्ती, तेलंगणा चळवळीतील शहीदांच्या कुटुंबियांना दिले जाते. या योजनेत तुम्हाला खूप कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT