Maharashtra Telangana Border : दोन राज्यांना जोडणारा मार्ग तेलंगणा पोलिसांकडून बंद; तेलंगणा प्रशासनाकडून अजब कारण

Chandrapur News : गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत दोन राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल आहे. या पुलावरून माल वाहतूक होते. त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जाते
Maharashtra Telangana Border
Maharashtra Telangana BorderSaam tv
Published On

चंद्रपूर : महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक तेलंगणा पोलिसांनी बंद केली आहे. महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत तेलंगणा प्रशासनाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत तेलंगणा पोलिसांकडून हि कारवाई केली जात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत दोन राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल आहे. याच पुलावरून माल वाहतूक होत असते. त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र तेलंगणा प्रशासनाच्या एका कृतीने या संबंधाला तडा जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीमुळे तेलंगणा राज्यातील मार्गाचे नुकसान होत असल्याचा जावईशोध तेलंगणा प्रशासनाने काढला. 

Maharashtra Telangana Border
Pune News : स्वारगेट बलात्कार प्रकरण; बस प्रशासनाचे मोठे पाऊल; पुणे, पिंपरी चिंचवडमधील बसस्थानकांबाबत महत्त्वाचा निर्णय

टोल टॅक्स वाचविण्यासाठी अन्य मार्गाचा वापर 

महामार्ग खराब होऊ नये यासाठी तेलंगणा प्रशासनाने थेट महाराष्ट्र राज्याच्या सीमेत पोलिसांना पाठवून वाहतूक बंद केली आहे. यामुळे सीमा भागातील नागरिक चांगले संतापले आहेत. यासंदर्भात तेलंगणा राज्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोल टॅक्स वाचवण्यासाठी पोडसा- सिरपूर मार्गाचा वापर केला जात आहे. यामुळे ही कारवाई केली जात आहे. 

Maharashtra Telangana Border
Pune Yerwada : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भ्रष्टाचार; चौकशी अहवालात धक्कादायक बाबी झाल्या उघड

नागरिक संतप्त 

टोल टॅक्स वाचविण्यासाठी अन्य मार्गाचा वापर केला असल्याने ट्रक चालकांना रस्त्याचे कारण सांगून परत पाठवले जात आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनावर कारवाई करीत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com