Ration Card Rule Saam Tv
बिझनेस

Ration Card: रेशन कार्डधारकांना आता ४५० रुपयांत मिळणार सिलिंडर; कसं? जाणून घ्या

Ration Card Holders Get Cyliner: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना आता ४५० रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात देशातील गरीब नागरिकांना कमीत कमी दरात जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांना कमीत कमी किमतीत रेशन दिले जाते. यासाठी भारत सरकारने रेशन कार्ड दिले आहे.

आता रेशन कार्डधारकांना ४५० रुपयांमध्ये सिलिंडर मिळणार आहे.राजस्थानमधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना कमीत कमी किंमतीत सिलिंडर मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच NFSA द्वारे दारिद्यरेषेखालील लोकांना कमीत कमी किंमतीत रेशन दिले जाते. त्यासाठी त्यांच्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. मात्र, आता त्यांना कमीत कमी किंमतीत रेशन कार्ड दिले जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर सरकारकडून ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Ration Card News)

राजस्थान सरकारने ही नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेत स्वस्तात सिलिंडर दिले जात आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांमध्ये सिलिंडर दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक एसणे गरजेचे आहे. (Ration Card Holders Get cylinder At 450 rupees)

राजस्थानमधील एक कोटींपेक्षा जास्त कुटुंबे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ घेत आहे. त्यापैकी ३७ लाख कुटुंबाना योजनेअंतर्गत ४५० रुपयांना सिलिंडर मिळत आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित ६८ लाख कुटुंबाना ४५० रुपयांना सिलिंडर दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT