IRCTC Saam Tv
बिझनेस

IRCTC New Rule : ट्रेन उशिराने आली, एसी बंद असेल तर तिकिटांचे पैसे मिळणार परत ; जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम

IRCT Rule : आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे. ट्रेन उशिराने आली, एसी बंद असेल तर आता २४ तासात तक्रार केल्यावर तुमच्या तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयआरसीटीसीने काढलेल्या नव्या नियमानुसार आता रेल्वे प्रवासात तुमचा एसी चालत नसेल किंवा ट्रेन उशिरा आली तर तुमच्या तिकिटाच्या पैशांचा परतावा मिळणार आहे. प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या गाड्या उशिरा आल्या तर प्रवाशांची अस्वस्थता वाढते. ट्रेनच्या एसी डब्यात एसी बंद असेल तर प्रवाशांची चीड चीड होते. या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून आयआरसीटीसीने नवी सुविधा सुरु केली आहे. जर तुमची गाडी उशिराने आली किंवा तुमच्या गाडीचा एसी बंद असेल तर तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. तुमची गाडी ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असेल आणि एसी कोचमध्ये २ तासांपेक्षा जास्त वेळ थंडावा मिळत नसेल तर तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइटवर तक्रार करावी लागेल. तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत परतफेडीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

ही परतफेड फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना लागू होणार आहे. जर तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि रद्द झाले असेल, तर हा नियम लागू होणार नाही. तसेच, जर ट्रेनला उशीर होण्याचे कारण नैसर्गिक आपत्ती असेल, तरीही परतफेड दिली जाणार नाही. एसी बिघाडाची तक्रार करण्यासाठी, तुम्हाला ट्रेनच्या टीटीई किंवा कर्मचाऱ्यांकडून लेखी तक्रार करावी लागेल, जेणेकरून पुरावा मिळू शकेल.

तक्रार नोंदवण्यासाठी कसा कराल अर्ज ?

जर तुमची गाडी उशिराने आली किंवा तुमच्या गाडीचा एसी बंद असेल तर तुम्ही तक्रार नोंदवून तुमच्या तिकिटांचे पैसे परत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइट (www.irctc.co.in) ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवरून IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडून तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्डने लॉगिन करा. होमपेजवर "तक्रार नोंदणी " पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करून तुमच्या तिकिटाचा पीएनआर क्रमांक, प्रवासाची तारीख आणि समस्या (ट्रेन उशिरा किंवा एसी बिघाड) प्रविष्ट करा. सर्व माहिती भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचे पैसे ७ ते १० दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात परत केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

SCROLL FOR NEXT