Farmer Loan Waiver 2026 google
बिझनेस

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू; यादी कधी आणि कुठे पाहाल?

Farmer Loan Waiver 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरु झाली आहे. लाभार्थी यादी पोर्टल, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती २०२६ योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेणं सोप्या आणि ऑनलाइन पद्धतीने देण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत योजनेचा फायदा मिळवण्यास मदत होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातल्या १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड केली आहे. याबाबतची माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. सर्व बँकांकडून पात्र शेतकऱ्यांचा तपशील विशेष पोर्टलवर अपलोड केला जात आहे. त्यानंतर प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक दिला जाईल. योजनेची अंतिम यादी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नावाची पडताळणी सहज करता येईल.

तसेच या योजनेबाबत शेतकऱ्यांना अधिकृत माहिती मिळावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखतीचे आयोजन केले आहे. या मुलाखतीमध्ये सहाय्यक निबंधक सुनील मरगळ यांनी योजनेची पात्रता, लाभार्थी निवड, लाभ मिळण्याची प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली आहे. ही मुलाखत गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

तसेच ती एफएम १०३.६ आणि NewsOnAir मोबाईल ॲपवरही ऐकता येणार आहे. योजनेची अचूक आणि अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी सर्व शेतकरी आणि नागरिकांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

Petrol Price India: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या युनिक 5 डिझाईन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

Brain tumor symptoms: डोळ्यांना सतत धुरकट दिसतंय? चष्म्याची गरज समजून दुर्लक्ष करू नका, हे ब्रेन ट्युमरचं पहिलं गंभीर लक्षण असू शकतं

Gaurav Khanna: 'ती माझी पत्नी आहे...'; सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चांना गौरव खन्नाचे सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT