Prasar Bharati Recruitment saam tv
बिझनेस

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Prasar Bharti Doordarshan Recruitment 2025: प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दूरदर्शनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असेल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दुरदर्शन केंद्रात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रसार भारतीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

दूरदर्शनमधील ही भरती रीजनल न्यूज युनिट, दूरदर्शन केंद्र भोपाळ येथे केली जाणार आहे. येथे न्यूज रीडर आणि कॉपी एडिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

जर तुम्हाला कॅमेरा हाताळण्याची सवय असेल आणि तुम्हाला भाषेचं उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ नोव्हेंबर रोजी सुरु झाली आहे. २१ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. न्यूज रीडर पदासाठी १६० रुपये आणि कॉपी एडिटर पदासाठी १५०० रुपये प्रतिदिन पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

न्यूज रीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केलेली असावे. ज्यांना कॅमेरापुढे काम करण्याची सवय असेल याचसोबत भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. याआधी टीव्ही किंवा रेडिओमध्ये काम केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

कॉपी एडिटर पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली असावी. पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे तसेच अनुभवाच्या प्रमाणपत्रांची कॉपी डायरेक्ट न्यूज, रीजनल न्यूज युनिट, दूरदर्शन केंद्र, श्यामला हिल्स, भोपाळ-४६२०१३ येथे पाठवायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नालासोपा-यात मुख्य रस्त्यावरील उघड्या गटारात पडला पादचारी नागरिक

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

SCROLL FOR NEXT