Matru Vandana Yojana 2 Saam TV
बिझनेस

Matru Vandana Yojana 2: दुसरी मुलगी झाल्यास घरात भरभराट होणार; प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २ मार्फत मिळणार पैसे

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2: दुसरं आपत्य मुलगी झाल्यास सरकार देणार पैसे; प्रधान मंत्री मातृवंदना २ योजना जाहीर

Ruchika Jadhav

Matru Vandana Yojana 2:

महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत सातत्याने नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. (Latest Marathi News)

स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता ते रोखण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. अनेक गावांत खेयड्यापाड्यांत आणि शहरांमध्येही बऱ्याच ठिकाणी मुलगाच हवा अशी मागणी असते. यासाठी अवैधरित्या गर्भ तपासणी देखील केली जाते. अशा अनेक दवाखाण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मुलीच्या कुटुंबीयांना ६ हजारांची रोख रक्कम देण्यात येणार आहे.

कुणाला मिळेल लाभ

आर्थिक उत्पन्नानुसार योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिला ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. तसेच १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ येता येणार आहे.

जुळी मुले झाली तर?

एखाद्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या, किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तरी देखील एका मुलीसाठीचेच पैसे महिलेला दिले जाणार आहेत.

अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. योजनेची संपूर्ण माहिती यावर तुम्हाला मिळेल. येथे देण्यात आलेला फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज करता येईल आणि लाभ घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT