Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office ची जबरदस्त योजना, तुम्हाला करेल मालामाल; गुंतवा फक्त ३३३ रुपये, मिळतील १७ लाख

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगले पैसे मिळतात. पोस्टाच्या अनेक योजना आहेत त्यापैकी एक योजना अशी आहे यामध्ये तुम्ही दिवसाला ३३३ रुपये गुंतवा. १० वर्षांनंतर यावर तुम्हाला १७ लाख रुपये परतावा मिळेल.

Priya More

Summary -

  • पोस्ट ऑफिस आरडी योजनेत ६.७ टक्के व्याजदर मिळतो

  • दिवसाला ३३३ रुपये गुंतवून १० वर्षांत १७ रुपये लाख मिळू शकतात

  • प्री-मॅच्युअर क्लोजर आणि कर्जाची सुविधा उपलब्ध आहे

  • मोबाईल किंवा ई-बँकिंगद्वारे खाते उघडता येते

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार परतावा मिळेल अशी योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी खूपच जबरदस्त ठरेल. पोस्ट ऑफिसकडून प्रत्येक वयोगटासाठी छोट्या बचत योजना चावल्या जातात. या योजनेद्वारे तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळतो. अशीच एक योजना आहे जी तुम्हाला मालामाल करेल. १०० रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता आणि यामध्ये तुम्ही दिवसाला ३३३ रुपये गुंतवणूक करून १७ लाख रुपयांचा फंड जमा करू शकता. ही योजना नेमकी काय आहे आणि यातून तुम्ही कसा जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता हे आपण जाणून घेणार आहोत...

मिळेल ६.७ टक्के व्याज -

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला ६.७ टक्के व्याज देते. तुम्ही फक्त १०० रुपये गुंतवणूक करून ही योजना सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत कुणीही खाते उघडू शकते. महत्वाचे म्हणजे १० वर्षांचा मुलगा देखील या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतो. पण या मुलाला आपल्या पालकांद्वारे खातं उघडावे लागेल. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या मुलाला नवीन केवायसी करावी लागेल आणि नवीन ओपनिंग फॉर्म भरावा लागेल. हे खातं मोबाईल बँकिंग किंवा ई-बँकिंगद्वारे उघडता येऊ शकते.

३ वर्षांनंतर प्री-मॅच्युर क्लोजरचा पर्याय -

जर तुम्ही या सरकारी योजनेअंतर्गत खाते उघडले तर तुमचे खाते ५ वर्षांत मॅच्युर होईल. ते वाढवण्याची सुविधा देखील दिली आहे. म्हणजेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते आणखी ५ वर्षांसाठी वाढवून गुंतवणूक सुरू ठेवू शकता. जर तुम्हाला हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करायचे असेल तर ही सुविधा देखील पोस्टाच्या या बचत योजनेत उपलब्ध आहे. जर गुंतवणुकदाराला हवे असेल तर तो ३ वर्षांनंतर प्री-मॅच्युर क्लोजरचा पर्याय निवडू शकतो. जर कोणत्याही कारणास्तव खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी त्यावर दावा करू शकतो. जर या नॉमिनीला हे खातं पुढे असेच सुरू ठेवायचे असेल तर ती व्यक्ती तसं करू शकतात.

कधी आणि कसे पैसे भरायचे -

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेअंतर्गत मासिक ठेवीचा नियम देखील वेगळा आहे. जर खाते कॅलेंडर महिन्याच्या १६ व्या दिवसापूर्वी उघडले असेल तर पहिल्या ठेवीच्या रक्कमेच्या बरोबरीची पुढील ठेव रक्कम प्रत्येक महिन्याच्या १५ व्या दिवसापर्यंत केली जाईल आणि जर खाते कॅलेंडर महिन्याच्या १६ व्या दिवसानंतर आणि शेवटच्या कामकाजाच्या दिवसानंतर उघडले असेल तर ठेव प्रत्येक महिन्याच्या १६ व्या दिवसापासून शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत केली जाईल.

कर्ज घेण्याची सुविधा -

रिकरिंग डिपॉझिट स्कीमअंतर्गत खाते तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडता येऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचे व्याजदर सरकारकडून दर तीन महिन्यांनी सुधारित केले जातात. आरडी योजनेची एक खास गोष्ट म्हणजे गुंतवणूकदाराला कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि जर आपण यासाठी निश्चित केलेल्या नियमांबद्दल बोललो तर खाते एक वर्ष सक्रिय झाल्यानंतर ठेव रक्कमेच्या ५० टक्क्यापर्यंत कर्ज म्हणून घेता येते आणि त्यावर २ टक्के व्याजदर लागू होतो.

महिन्याला १० हजार गुंतवणूक -

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही दररोज फक्त ३३३ रुपये वाचवू शकता आणि १७ लाख रुपयांचा निधी आपल्या खात्यात जमा करू शकता. दररोज तुम्ही ३३३ रुपये वाचवून तुमची मासिक गुंतवणूक १०,००० रुपये प्रति महिना होईल. आता ६.७ टक्के व्याजदरानुसार ५ वर्षांसाठी नियमितपणे गुंतवणूक करून तुम्ही एकूण ६,००००० रुपये गुंतवाल आणि त्यावरील व्याज १,१३००० रुपये असेल. तर जर तुम्ही ते ५ वर्षांसाठी वाढवले तर तुमच्या एकूण १२ लाख रुपयांच्या ठेवीवरील व्याज रक्कम ५,०८,५४६ रुपये होईल.

१७ लाख कसे मिळतील?

१० वर्षांनंतर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज आणि मुद्दलासह एकूण १७,०८,५४६ रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक रक्कम बदलू शकता. जर तुम्हाला दरमहा १०,००० रुपये गुंतवणूक करणं शक्य नाही. तर तुम्ही दरमहा ५,००० रुपये गुंतवले तरी चालतील. ५,००० रुपयांच्या गुंतवणुक क ५ वर्षांसाठी वाढवले तर १० वर्षांत तुम्हाला ८,५४,२७२ रुपये मिळतील. ज्यामध्ये फक्त व्याजातून तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT