Post Office Best Scheme X
बिझनेस

Post Office Scheme: फक्त व्याजातून २ लाख रुपये कमवा, पोस्टाची मालामाल करणारी योजना

Post Office Time Deposit Scheme : पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूकीवर सरकार ७.५ टक्क्यांचा व्याजदर गेत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास फक्त व्याजामधून २ लाख रुपये कमवता येतील.

Yash Shirke

आजकाल प्रत्येकजण पगारातून काही रक्कम वाचवून कुठेतरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. पैसे सुरक्षित राहतील आणि चांगले रिटर्न्स मिळतील अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. अशांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी टाइम डिपॉझिट योजना फायदेशीर ठरु शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून २ लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येईल.

लहानांपासून ते थोरांपर्यंत, प्रत्येक वयोगटासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत योजना चालवल्या जात आहेत. जबरदस्त रिटर्न्स, सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलतींचा लाभ यामुळे टाइम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात. सरकार या योजनेत गुंतवणूकदारांना ७.५ टक्के व्याजदर देत आहे. थोडक्यात रिटर्न्स देण्याच्या बाबतीत ही योजना Saving Scheme पेक्षा पुढे आहे.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेच्या अंतर्गत, गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. यात १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात. एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ६.९ टक्के व्याज मिळते. तर २ किंवा ३ वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास ७ टक्के व्याजदराने पैसे मिळतात. ५ वर्षांसाठीच्या गुंतवणूकीत ७.५ टक्के दराने व्याज मिळते.

गुंतवणूकदार केवळ व्याजातून २ लाख रुपयांपर्यंतची कमाई करु शकतात. पाच वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले, तर ७.५ टक्के व्याजदराने गुंतवणूकदाराला ५ वर्षांच्या कालावधीत २,२४,९७४ रुपये रिटर्न मिळेल. व्याज आणि गुंतवणूकीची रक्कम अशी एकूण ७,२४,९७४ रुपये मिळतील. याचा अर्थ व्याजातून २ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल.

टाइम डिपॉझिट योजनेमध्ये ग्राहकांना आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या योजनेत एक किंवा संयुक्त खाते उघडता येते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. किमान एक हजार रुपयांपासून खाते उघडता येते. यात दरवर्षी व्याजाचे पैसे जोडले जातात. कमाल गुंतवणूकीवर कोणतीही मर्यादा नाही. हवे तितके पैसे टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphones: जबरदस्त कॅमेरा अन् दमदार स्टोरेज; 40 हजाराच्या आतमधील शानदार 5G मोबाईल फोन

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT