Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! वर्षाला फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर चांगले व्याज मिळते. सध्या या योजनेत ८.२ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून २.४६ लाख मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम

वर्षाला मिळणार २,४६,००० रुपये

तिमाही आधारावर मिळते व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतोच. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला एकदम जास्त रक्कम मिळते. याचसोबत टॅक्स बेनिफिटदेखील मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या योजनांसाठी सरकार दर तीन महिन्यांनी नवीन व्याजदर जाहीर करते. सरकारने मार्च २०२६ पासून तिमाही व्याजदर जाहीर केले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते.

पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळणार आहे. या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर ३ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. जर तुम्ही ३० लाख गुंतवले तर तिमाही आधारावर ६१,५०० रुपये व्याज मिळेल.

पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला वर्षभरात चार वेळा व्याज मिळणार आहे. म्हणजेच एकूण २,४६,००० रुपये मिळणार आहे. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूकीमुळे तुम्हाला फायदाच होणार आहे.

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून ते ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळणार आहे. सीनियर सिटीजन इनकम अधिनियमच्या कलम 80TTB अंतर्गत 50,000 रुपयांवर सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT