भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office) अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. मोठ्या संख्येने लोकं पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. आपणही या योजनेत पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळतोय. (latest investment scheme)
खरं तर पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे जोखीममुक्त मानले जाते. अशीच एक भन्नाट योजना पोस्ट ऑफिसने सुरू केली आहे. या योजनेचं नाव ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) आहे. या योजनेत आपण दररोज 50 रुपये जमा करून एकदाच 35 लाख रूपयांचा नफा मिळवू शकतो. या योजनेतंर्गत गंतवणूक कशी करावी, या योजनेमध्ये परतावा कसा मिळेल, पात्रता काय, किती गुंतवणूक करू शकतो, अशी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊ या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ग्राम सुरक्षा योजनेची माहिती
पोस्ट ऑफिस योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा भाग आहे. 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी ही विमा पॉलिसी सुरू करण्यात आली (Post Office Scheme) होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेत 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
ग्राम सुरक्षा योजनेत दर महिन्याला 1,515 रुपये म्हणजेच दररोज केवळ 50 रुपये गुंतवले, तर 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू (Post Office Gram Suraksha Yojana) शकतो. जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केली, तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला 1,511 रुपये प्रीमियम भरावा लागेल. गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.
ग्राम सुरक्षा योजनेचे नियम
ही योजना १९ ते ५५ वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी खुली (Yojana) आहे.
या योजनेची किमान विमा रक्कम दहा हजार रूपये ते 10 लाख रूपयांपर्यंत आहे.
या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरता येतो.
प्रीमियम भरण्यासाठी, तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी मिळतो
ही योजना तुम्हाला कर्ज काढण्याचीही परवानगी देते.
या योजनेत तीन वर्षांच्या सहभागानंतरही निवड रद्द करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.