Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३३३ रुपये भरा अन् फक्त व्याजातून कमवा ५ लाख रुपये

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत फक्त व्याजातून तुम्ही ५ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना

दररोज फक्त ३३३ रुपये गुंतवला

व्याजातून कमवा ५ लाख रुपये

प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. यासाठी आतापासूनच गुंतवणूक करायला हवी. तुमच्या पगारातील एक ठरावीक रक्कम गुंतवायची असते. ही रक्कम गुंतवल्यानंतर भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. या योजनांवर चांगला परतावा मिळेल. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना पोस्टाद्वारे चालवली जाते. त्यामुळे सरकार स्वतः तुम्हाला सुरक्षिततेची गॅरंटी देते.या योजनेतून तुम्ही फक्त व्याजातून ५ लाख रुपये मिळवू शकतात.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना प्रत्येक वयोगटासाठी लागू आहे. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक ठरावीक रक्कम हवी असेल ज्यामुळे तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासू नये. तर या योजनेत नक्की गुंतवणूक करा. या योजनेत पैशांसोबतच लोन बेनिफिटदेखील मिळतात. यासाठी तुम्हाला पोस्टात अकाउंट उघडायचे आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत ६.७ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असणार आहे. या कालावधीला तुम्ही पुढचे ५ वर्षदेखील वाढवू शकतात.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही फक्त व्याजातून ५ लाख रुपये मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला दररोज ३३३ रुपये गुंतवायचे आहेत. या हिशोबाने तुमचे महिन्याला १०,००० रुपये वाचणार आहे. पाच वर्षासाठी तुम्ही हे पैसे ठेवले तर ६ लाख रुपये गुंतवणार आहात. त्यावर तुम्हाला १,१३,६५९ रुपये व्याज मिळणार आहे. एकूण ७,१३,६५९ रुपये मिळणार आहे. जर तुम्ही अजून पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणूकीची रक्कम १२ लाख होणार आहे. त्यावर ५,०८,५४६ रुपये व्याज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT