Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: फक्त व्याजातून २.५४ लाखांची कमाई, पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल माहिती आहे?

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसर रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही फक्त व्याजातून २.५४ लाख रुपये मिळवू शकतात. या गुंतवणूकीवर तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसर स्मॉल रिकरिंग डिपॉझिट योजनेत सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही दररोज ५ हजार रुपये गुंतवून ८ लाख रुपये कमवू शकतात.या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजदेखील मिळते. (Post Office Scheme)

या योजनेत तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर ६.७ टक्के व्याज मिळते. या योजनेत तिमाही आधारावर व्याज मिळते परंतु याचा लाभ तुम्हाला वर्षाने मिळते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही ५००० रुपये महिना गुंतवून ८ लाख रुपये जमा करु शकतात. जर तुम्ही ५,००० रुपये गुंतवतात तर मॅच्युरिटी पीरियड म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला ६.७ टक्के व्याजदरानुसार ५६,८३० रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुमची गुंतवलेली रक्कम ३,५६,८३० रुपये होणार आहे. (Post Office Recurring Deposite Scheme)

या योजनेत जर तुम्ही पाच वर्षानंतरदेखील गुंतवणूक केली म्हणजेच तुम्ही १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमचे एकूण ६ लाख रुपये जमा होतील. त्यानंतर या योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळेल. म्हणजेच एकूण २,५४,२७२ रुपये व्याज मिळते. त्यामुळे १० वर्षानंतर तुम्हाला एकूण ८,५४,२७२ रुपये मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेवर तुम्हाला लोनदेखील मिळू शकते. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT