Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज फक्त ३४० रुपये गुंतवा अन् ७ लाख मिळवा

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहे. दर महिन्याला तुम्हाला १०,०० रुपये गुंतवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ७ लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. तसेच सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. प्रत्येक महिन्याला काही न काही खर्च हा वाढतो. त्यामुळे पैशांची वेळीच बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम (Post Office RD Scheme)

पोस्ट ऑफिस आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मेडिकल खर्च असो किंवा मुलांचे शिक्षण सर्व गोष्टींसाठी हे पैसे तुम्हाला कामाला येणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला फक्त काही ठरावीक रक्कम जमा करायची आहे. यानंतर तुम्हाला चांगला फंड मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत तुम्ही फक्त १०० रुपये गुंतवूनदेखील खाते उघडू शकतात. या योजनेत सुरक्षित परतावा आणि व्याजदरदेखील मिळते.

महिन्याला फक्त १०,००० रुपये गुंतवायचे (Invest Monthly 10,000 Rupees)

या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला फक्त १०,००० रुपये जमा केले तर ५ वर्षानंतर तुम्हाला ७,१२,६५९ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला दररोज ३४० रुपये गुंतवायचे आहे. यामध्ये ६ लाख रुपये तुम्ही जमा केलेले असणार आहे आणि १,१३,६५९ रुपये व्याजाचे असणार आहे.

या योजनेत जर तुम्ही एका वर्षासाठी आरडी सुरु ठेवणार असाल तर तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर ५० टक्के लोन घेऊ शकतात. या योजनेत तुम्ही नोकरी करणारे लोक, दुकानदार, महिला आणि विद्यार्थी लाभ घेऊ शकतात.

५ वर्षांची स्कीम

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ५ वर्षांची असणार आहे. तुम्ही या योजनेत अजून ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो गरजेचा आहे. तुम्ही ऑनलाइन अकाउंट उघडू शकतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे जमा करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Parbhani Accident : मध्यरात्री परभणीत भीषण अपघात, ट्रक अन् ऑटोच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

Shocking: जंगलात ओढत नेत मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांच्या तावडीतून पळाली; पण ट्रक चालकानेही अंगाचे लचके तोडले

धक्कादायक! एस्केलेटरमध्ये अडकलं तरुणाचं डोकं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल

PMC Recruitment: इंजिनियर झालात? पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT