Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत फक्त व्याजातून तुम्ही अडीच लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम

फक्त व्याजातून मिळणार अडीच लाख

पैसे गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकाने आपल्या भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच बचत करायला हवी. दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवा. दरम्यान, तुम्ही ही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला व्याजावरदेखील व्याज मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योना सरकारद्वारे चालवली जाते. त्यामुळे या योजनेत सुरक्षेची हमी असते. तुम्हाला या योजनेत महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. फक्त ५ हजार रुपये गुंतवून तुम्ही ८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत फक्त व्याजातून तुम्हाला २.५४ लाख रुपये मिळणार आहेत.

व्याजदर (Post Office RD Scheme Interest Rate)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर तिमाही आधारावर असते. त्यामुळे तीन महिन्यांनी ही व्याजदर बदलू शकते.

कॅल्क्युलेशन (Post Office Recurring Deposite Scheme)

पोस्ट ऑफिसर आरडी योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. ५ वर्षासाठी तुम्ही हे पैसे गुंतवायचे आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी तुम्ही ३ लाख रुपये गुंतवणार आहेत. यावर ६.७ टक्के व्याजदरानुसार ५६,८३० रुपये व्याज मिळणार आहे.

पोस्टाच्या आरडी योजनेत जर तुम्ही अजून ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर एकूण ६ लाख रुपये गुंतवणार आहात. त्यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला १०वर्षात एकूण ८,५४,२७२ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT