Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ९,२५० रुपये

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममधील गुंतवणूक ही खूप फायद्याची ठरते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ९,२५० रुपये व्याजातून मिळणार आहे.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम

दर महिन्याला मिळणार ९,२५० रुपये

पत्नीसोबत उघडू शकता जॉइंट अकाउंट

पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसने नागरिकांसाठी अनेक बचत योजना राबवल्या आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होतो. यातील पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. या योजनेत तुम्ही पत्नीसोबत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ९,२५० रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्हाला जबरदस्त व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते.त्यामुळे या योजनेत तुम्ही कोणतीही काळजी न करता गुंतवणूक करु शकतात. या योजनेत फक्त १००० रुपये भरुन अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कोणीही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला ७.४० टक्के व्याजदर मिळते. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो.

पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची आहे. तुम्ही जर सिंगल अकाउंट उघडले तर तुम्हाला ९ लाख रुपये गुंतवता येणार आहे. जॉइंट अकाउंटमध्ये तुम्ही एकूण १५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही पत्नीसोबत अकाउंट उघडू शकतात. जर तुम्ही १५ लाख रुपये गुंतवले तर ७.४ टक्के व्याजदराने तुम्हाला महिन्याला ९,२५० रुपये व्याज मिळणार आहे. तर ९ लाखांवर व्याजातून होणारी कमाई ५५०० रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Fake Death News: धर्मेंद्र यांच्यानंतर जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा, नेमकं सत्य काय?

Maharashtra Live News Update : प्रकाश आंबेडकरांकडून महाविकास आघाडीवर मोठा आरोप

Delhi car Blast Live updates : हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा

नशा करून आला अन् बायकोवर लघवी करण्याचा प्रयत्न; विरोध करताच धारदार शस्त्रानं जागीच संपवलं

Delhi Car Blast : गुजरातमध्ये विष, हरियाणात RDX अन् दिल्लीत स्फोट, डॉक्टरच्या आडून कोण डाव साधतेय?

SCROLL FOR NEXT