Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला दर महिन्याला ९,२५० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना

एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला पेन्शन मिळवा

दर महिन्याला मिळणार ९,२५० रुपये

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पैसे मिळतात. रिकरिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट या योजनांमध्ये चांगले व्याजदर मिळते. याचसोबत इतरही अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळेल. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते.

या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. या योजनेच्या व्याजदरातून तुम्हाला चांगली रक्कम मिळते. सध्या या योजनेत ७.४ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळतो. परंतु या योजनेसाठी काही अटी आणि नियम आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला ५ वर्षासाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. दर महिन्याला तुमच्या खात्यात ७.१ टक्के व्याजानुसार रक्कम जमा होईल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही रक्कम परत मिळते. यात तुम्हाला व्याजदरदेखील मिळते.

पीओएमआयएसमध्ये सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतो. या दोन्ही खात्यात डिपॉझिट करण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. सिंगल अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करु शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये एकूण १५ लाख रुपये जमा करु शकतात. जर तुम्ही जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला महिन्याला ९,२५० रुपयांची पेन्शन मिळू शकते. या योजनेत ७.४ टक्क्यांनुसार व्याजदर मिळते.

महिन्याला इतके पैसे मिळणार

जॉइंट अकाउंटमध्ये जर तुम्ही १५ लाख गुंतवले तर त्यावर ७.४ टक्क्यानुसार महिन्याला ९,२५० रुपये मिळणार आहेत तर वर्षाला १,११,००० रुपये मिळणार आहे. पाच वर्षात तुम्हाला ५,५५,००० रुपये मिळणार आहेत.

अटी

या योजनेत पैशांची गरज भासली तर तुम्ही ५ वर्षांपूर्वी पैसे काढू शकतात. परंतु त्यासाठी काही अटी आहेत. तुम्हाला प्री मॅच्युअर विड्रॉल पेनल्टी द्यावी लागणार आहे. १ ते ३ वर्षांच्या कालावधीत रक्कम काढली तर २ टक्के दंड भरावा लागेल. ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत पैसे काढले तर १ टक्के दंड भरावा लागेल.

या योजनेत फक्त भारतीय नागरिक अकाउंट उघडू शकतात. मुलांचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक अकाउंट उघडून ते अॅक्टिव्हेट करु शकतात. या योजनेत अकाउंट उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. अकाउंट उघडण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Benefits: दररोज सकाळी बदाम खाताना खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Politics : इंडिया आघाडीला दुहेरी धक्का, २ बड्या नेत्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

SCROLL FOR NEXT