PAN Card Fraud Warning: Saam Tv
बिझनेस

Post Office Fraud Alert: पोस्ट ऑफिस पेमेंट्स बँक अकाउंट होल्डर सावधान! एक क्लिक करताच खाली होईल बँक खातं

PAN Card Scam Messages to Post Office Account Holders: पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्यांना पॅनकार्ड अपडेट करायचं असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते.

Bharat Jadhav

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड तपशील अपडेट करण्याच्या नावाखाली गंडा घालवणारे मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये ग्राहकाना पॅनक़कार्ड अपडेट करण्यास सांगितलं जात आहे. ज्यांनी पॅन कार्ड अपडेट केले नाही तर त्याचे खाते ब्लॉक केले जाईल. हा मेसेज एका लिंकसह येतो.

तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही असाच मेसेज आलाय का? आला असेल तर सावध व्हा! या मेसेजने तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. या मेसेजवर क्लिक केल्यास तुमचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याचं भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने म्हटलंय.

पीआयबी स्पष्ट केलं की, इंडिया पोस्ट असे मेसेज कधीच पाठवत नाही. ग्राहकांना पाठवला जाणारे मेसेज हे खोटे आहेत. हे मेसेज खोटे आहेत हे कशावरुन ओळखायचे हे जाणून घेऊ. “प्रिय युझर्स, तुमचे पोस्ट ऑफिस पेमेंट्स बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले आहे. कृपया तुमचे पॅन कार्ड त्वरित अपडेट करा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा..." हे मेसेज अशा प्रकारे लिहिलेले असतात की, लोक त्यांना अधिकृत समजतात.

त्यामुळे ते लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि क्लिक करतात. पण प्रत्यक्षात हे 'फिशिंग' मेसेज असतात. यात तुमच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती चोरण्याचा सापळा असतो. फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये फसवणूक करणारे एखाद्या व्यक्तीची/तिची संवेदनशील माहिती बनावट मेसेजद्वारे शेअर करतात. याद्वारे ते तुमच्या खात्यातून पैसे चोरण्याचा किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस टाकण्याचाही प्रयत्न केला जातो.

यापासून कसे वाचावे

पोस्ट ऑफिस पेमेंट्स बँकेने सोशल मीडियावर काही टिप्स दिल्यात. ज्या तुम्हाला डिजिटल बँकिंग वापरताना सुरक्षित राहण्यास मदत करतील.

सावध रहा: ईमेल किंवा संदेशाची संपूर्ण सामग्री काळजीपूर्वक वाचा, केवळ प्रेषकाच्या नावावर विश्वास ठेवू नका.

लिंक तपासा: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची वैधता निश्चित करा. URL च्या सुरुवातीला ‘https’ दिलेला आहे हे देखील पाहिले पाहिजे.

मेसेजच्या भाषेकडे लक्ष द्या: व्याकरणाच्या चुका, अनौपचारिक भाषा आणि चुकीचे मेसेज बनावट असल्याचं दर्शवू शकतात.

अँटीव्हायरस वापरा: तुमच्या डिव्हाइसवर नेहमी अपडेटेड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असून द्या.

सार्वजनिक वाय-फाय टाळा: सार्वजनिक नेटवर्कवर बँकिंगशी संबंधित किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.

काय करू नये

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी टेक्स्ट मेसेजमध्ये दिलेल्या लिंक कधीही उघडू नका.

वैयक्तिक माहिती शेअर करू नका: बँका किंवा कोणतीही कायदेशीर संस्था तुम्हाला वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगत नाही.

बनावट कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका आणि लॉटरी किंवा बक्षिसांची खोटी आश्वासने टाळा.

असुरक्षित नेटवर्क टाळा: इंटरनेट बँकिंग वापरताना नेहमी सुरक्षित नेटवर्क वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT