Porsche Car Rate Saam Tv
बिझनेस

Porsche Car Price: 200 kmph च्या स्पीडने जाणाऱ्या Porsche कारची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील! खासियत काय?

Porsche Car Price In India: जगभरात अनेक महागड्या कार आहेत. ज्या कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अशीच एक कार म्हणजे पोर्श. पोर्श ही जगातील महागड्या कारपैंकी एक आहे. या कारची किंमत जवळपास कोट्यवधींच्या घरात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांचे स्वतः ची कार घेण्याचे स्वप्न असते. प्रत्येकजण महागडी आणि चांगली कार घ्यायचा विचार करत असतो. जगभरात अनेक महागड्या कार आहेत. ज्या कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या कारच्या किंमती एवढ्या आहेत की त्या किंमतीत तुम्ही स्वतः चे घर खरेदी करु शकतो. तशीच एक कार म्हणजे पोर्श. पोर्श ही जगातील महागड्या कारपैंकी एक आहे. या कारची किंमत जवळपास कोट्यवधींच्या घरात आहे. याच कारची किंमत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतात पोर्श कारची किंमत ८८.६० लाखांपासून सुरु होते. भारतातील सर्वात महागडी पोर्श कार ४.२६ कोटी रुपयांना विकली जाते. या कारचे नाव Porsche 911 आहे. या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर देण्यात आले आहे.

पोर्श ही जर्मनीतील ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनी हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार, एसयूवी आणि सेडान कारसाठी ओळखली जाते. कंपनीच्या या कार संपूर्ण जगभरात विकल्या जातात. पोर्श कारची किंमत ८८.०६ लाख रुपयांपासून ते ४.२६ कोटी रुपयांपर्यंत आहे. भारतात Porsche 911 ही सर्वाधिक महागडी कार आहे. कारची किंमत १.८६ कोटी ते ४.२६ कोटींपर्यंत आहे. तर पोर्श क्यान कारची किंमत १.३६ कोटी ते २ कोटी रुपये आहे. पोर्श टायकन कारची किंमत १.६१ कोटी ते २.४४ कोटी रुपये आहे. पोर्श मैकन कारची किंमत ८८.०६ लाख ते १.५३ कोटी रुपये आहे. पोर्श पॅनामेरा कारची किंमत १.६८ कोटी रुपये आहे. कंपनीच्या या कार सर्वात जास्त विकल्या जातात.

पोर्श कार अनेक बड्या व्यक्तींकडे, उद्योजकांकडे आणि सेलिब्रिटींकडे आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलकडे Porsche 911 GT3 कार आहे. त्याचसोबत राम कपूर, फरहान अख्तर आणि माधुरी दिक्षितकडेदेखील पोर्श कार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

SCROLL FOR NEXT