Smartphone under 10000 saam tv
बिझनेस

Smartphone under 10000 : खिशाला परवडणारा स्मार्टफोन लाँच; 12 GB रॅम, हटके कॅमेरा आणि बरंच काही, वाचा एका क्लिकवर

POCO M7 5G Smartphone: खिशाला परवडणारा स्मार्टफोन लाँच झाला आहे. या मोबाईलमध्ये 12 GB रॅम, हटके कॅमेरा आणि बरंच काही आहे. या स्मार्टफोनची माहिती वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

मुंबई : 'पोको'ने एम७ ५जी स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा स्मार्टफोन किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ निर्माण करत आहे. 'पोको'चा हा स्मार्टफोन ९९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये जीबी रॅम ते डिस्प्ले असे सर्व फिचर्स उपलब्ध आहेत.

'पोको'मध्ये एम७ ५जी त्‍याच्‍या सेगमेंटमध्ये सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घेता येणार आहे. पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देणारा आहे.

स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेटची शक्‍ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन डिवाईसचा वापर करणाऱ्या युजरसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. स्मार्टफोनचा ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्ट आणि आकर्षक फोटो कॅप्‍चर करता येतो.

poco

पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये काय?

स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम

सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्‍ले - टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शन

५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर

५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्‍ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्‍स चार्जर)

नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस

पोको एम७ ५जी स्मार्टफोन हा फक्‍त ९,९९९ रूपयांमध्‍ये ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएन्ट उपलब्ध आहे. १०,९९९ रूपयांमध्‍ये ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएन्ट उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT