ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोबाईल आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे.
आजकाल घरात बसूनच मोबाईलवरुन अनेक कामे होतात.
अनेकदा आपण झोपताना फोन डोक्याच्या शेजारी ठेवून झोपतो.
पण या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर काही गंभीर परिणाम होऊ शकतात.
फोनमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅगनेटिक रेडिएशन निघतात.
मोबाईलमधून निघणाऱ्या या रेडिएशनचा मेंदूवर गंभीर परिणाम होतो.
झोपताना मोबाईल शरीरापासून कमीत कमी ३ फूट लांब ठेवावे.