ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कांग्रेस पार्टीची प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या वजनावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, रोहितचे वजन जास्त आहे.
शमा मोहम्मद यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. यानंतर पार्टीच्या आदेशानंतर तो ट्विट त्यांना डिलीट करावा लागला.
या सर्व गोष्टीनंतर एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार क्रिकेटपटू रोहित शर्माच वजन किती.
गूगलवर मिळालेल्या माहितीच्या मते, रोहित शर्माचं वजन ७२ किलो आहे.
गूगलच्या मते, रोहित शर्माची उंची ५ फूट ९ इंच आहे. त्याचे वय ३७ वर्ष आहे.
रोहित शर्माच्या वजनावर टिप्पणी केली जात असली तरीही तो पूर्णपणे फिट आहे. यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.
रोहित शर्मा आणि संघाकडे चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकण्याची उत्तम संधी आहे. सेमिफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा चुरशीचा सामना रंगणार आहे.