PNB Recruitment Saam Tv
बिझनेस

PNB Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

Punjab National Bank Recruitment 2026: पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी

इंजिनियर पदासाठी केली जाणार भरती

अर्ज कसा करावा?

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारी बँकेत भरती निघाली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हालाही अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे. २१ एप्रिलपासून तुम्ही अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी ऑनलाइन टेस्ट २७ मे २०२६ रोजी होणार आहे. त्याआधी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती

पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर सिविल इंजिनियर JMG स्केल I, ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनियर JMG स्केल I, ऑफिसर मॅकेनिकल इंजिनियर JMG स्केल I या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ३० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

ऑफिसर सिविल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिविल इंजिनियरिंगमध्ये बी.ई किंवा बीटेक केलेले असावे. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत १ वर्षांचा अनुभव असायला हवा.मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई किंवा बीटेक केलेले असावे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हीही ऑनलाइन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Fruits: पावसाळ्यात कोणत्या फळांचं सेवन केलं पाहिजे?

Maharashtra News Live Update: बीड शहरात बील मागितल्याने हॉटेल चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Glowing Skin Tips: महागडे स्किन केअर नको; तर 'हे' ज्यूस देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो

Smartphone security: रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोनमध्ये या ७ चुका करताय? पर्सनल डेटा होऊ शकतो लीक

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: हायकोर्टाच्या इशाऱ्यानंतर शिंदेसेनेचा रमेश म्हात्रे पोलिसांत शरण; IMA चा २० जुलैचा बंद मागे

SCROLL FOR NEXT