PNB Fraud Saam Tv
बिझनेस

PNB Fraud: बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! पंजाब नॅशनल बँकेत २४३४ कोटींचा घोटाळा

Punjab National Bank 2434 Crore Loan Fraud: पंजाब नॅशनल बँकेत जवळपास २४३४ कोटींचा घोटाळा झाला आहे. बँकेने लोन दिलेल्या दोन कंपन्यांवर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Siddhi Hande

पंजाब नॅशनल बँकेत फसवणूक

SREI च्या दोन कंपन्यांमुळे घोटाळा

जवळपास २४३४ कोटींचा घोटाळा

बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल २४३४ कोटींचा लोन घोटाळा झाला आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेकडे याबाबत तक्रार केली आहे.या प्रकरणात एसआईआय ग्रुपच्या दोन कंपन्या एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स आणि एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सचा समावेश आहे, असं सांगण्यात येत आहे.

ग्राहकांवर कोणताही परिणाम नाही

पंजाब नॅशनल बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार,एसआरईआर इक्विपमेंट फायनान्सशी संबंधित फसवणूक अंदाजे १,२४१ कोटी आहे तर SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सशी संबंधित रक्कम ११९३ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये थकबाकीसाठी १०० टक्के रक्कम तरतूद केली आहे. त्यामुळे याचा बँकेच्या खात्यांवर कोणत्याही परिणाम होणार आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाहीये.

NCLT ने सुचवला होता उपाय

या दोन्ही कंपन्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचा हा ठराव मंजुर झाला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये NARCL योजनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर कंपन्यांच्या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

SREI ग्रुपने १९८९ वित्त क्षेत्रात प्रवेश केला. बांधकाम क्षेत्रात या कंपनीची वेगळी ओळख आहे. दरम्यान, खराब आर्थिक व्यवस्थापन आणि थकबाकीमुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली.

बँकेच्या नफ्यात वाढ

बँकेने सप्टेंबरमध्ये तिमाहीसाठी ६४३ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे नोंदवले होते. हा आकडा यावरषी वाढला आहे. तरतुदींचा आकडा ९६.९१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जो बँकेसाठी सकारात्मक संकेत मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयानक! बियरच्या बाटलीत लघवी भरली अन् सोनूला पाजली, टॉर्चरचा व्हिडिओ कुटुंबाला पाठवला

Winter Diet: वजन कमी करायचंय? मग नाश्त्यात हा १ पदार्थ खा, दिवसभर पोट भरलेलं राहील

The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख

SCROLL FOR NEXT