स्वतः चा बिझनेस सुरु करावा अशी अनेकांची इच्छा असते. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल असणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच अनेकजण बिझनेस सुरु करत नाही. परंतु सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला ज्यात तुम्हाला ३ लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करु शकता.
सरकारची पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देते. या योजनेत तुम्हाला कोणतीही गॅरंटी देण्याची गरज नाही आहे. (Latest News)
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यक्ती आपला व्यवसाय सुरु करु शकतात. या योजनेत व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाख रुपयांचे लोन मिळते. या योजनेत दोन टप्प्यात लोन दिले जाते. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांचे लोन दिले जाते. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाख रुपयांचे लोन दिले जाते. हे लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी देण्याची गरज नाही.
मोदी सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये ही योजना लाँच केली होती. या योजनेअंतर्गत स्किल ट्रेनिंगची व्यवस्था केली जाते. या ट्रेनिंगदरम्यान स्टायपेंडची तरतूद करण्यात येते.पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या १८ ट्रेडमधील लोकांना कर्ज मिळू शकते. या लोकांना मास्टर्स ट्रेनरमार्फत हे ट्रेनिंग दिले जाते. याचसोबत ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.
पात्रता
अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभार्थी १८ ट्रेडमधील असायला हवा.
अर्जदाराचे वय १८ पेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असायला हवे.
या योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांना मान्यताप्राप्त संस्थेचे ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्जदार १४० जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड
आय प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट साइज फोटो
बँक पासबुक
मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा
या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी सर्वप्रथम pmvishwakarma.gov.in वर भेट द्या.
यानंतर Apply Online वर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या फोनवर पाठवला जाईल.
यानंतर फॉर्म भरा. यात आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
Edited by-Siddhi Hande
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.