PM Viksit Bharat Rojgar Yojana ₹15000 eligibility criteria saam tv
बिझनेस

आनंदाची बातमी! सरकार लाडक्या भावांच्या बँक खात्यात टाकणार १५००० रुपये, काय आहे नवी योजना?

PM Viksit Bharat Rojgar Yojana: तुम्हीही १ ऑगस्ट २०२५ नंतर तुमची पहिली नोकरी जॉईन केली आहे का? तसे असेल तर शुक्रवारी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Bharat Jadhav

  • पीएम विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत पात्र तरुणांना ₹15,000 मिळणार आहेत.

  • १ ऑगस्ट २०२५ नंतर पहिली नोकरी लागलेल्या तरुणांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जून रोजी ₹2,400 कोटींचा निधी वितरित करणार

PM Viksit Bharat Rojgar Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जून रोजी देशातील तरुणांना एक मोठं गिफ्ट देणार आहेत. 'पीएम विकसित भारत रोजगार योजने'अंतर्गत (PM-VBRY), पंतप्रधान २,४०० कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करणार आहेत. या योजनेचा कार्यक्रम १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 'पीएम विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेंतर्गत पहिला हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे. या योजनेचे मूळ नाव 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजना' असे होते. जे नंतर बदलण्यात आले. रोजगार निर्मितीला गती देणे, रोजगाराचे औपचारिकीकरण करणे, रोजगारक्षमता वाढवणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

'पीएम विकसित भारत रोजगार योजना' काय आहे?

'पीएम विकसित भारत रोजगार योजना'चा उद्देश देशातील रोजगाराच्या संधींना चालना देणे आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पहिल्यांदाच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपये देते. यासह रोजगार देणाऱ्या कंपन्यांना प्रति कर्मचारी दरमहा ३,००० रुपये दिले जातात. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना हा लाभ चार वर्षांसाठी मिळतो, तर इतर सर्व क्षेत्रांतील कंपन्यांना प्रति कर्मचारी दरमहा ३,००० रुपये दोन वर्षांसाठी मिळतील.

तरुणांच्या खात्यात १५,००० रुपये जमा होणार?

जे तरुण १ ऑगस्ट २०२५ नंतर पहिल्यांदाच नोकरीला लागले आणि ज्यांचे पीएफ (PF) खाते पहिल्यांदाच उघडले गेले, अशा तरुणांच्या खात्यात १५,००० रुपये जमा करण्यात येणार आहेत. यासह या तरुणांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना प्रति कर्मचारी ३,००० रुपये मिळतील. एकूण ९९,४४६ कोटी रुपयांच्या तरतुदीसह, या योजनेचा उद्देश दोन वर्षांत ३.५ कोटींहून अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे आहे. यापैकी सुमारे १.९२ कोटी लाभार्थी पहिल्यांदाच रोजगार क्षेत्रात प्रवेश करतील.

कोणाला मिळतील पैसे ?

योजनेच्या नियमांनुसार, १५,००० रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. ही रक्कम केवळ अशा कर्मचाऱ्यांनाच मिळेल ज्यांचा पीएफ (PF) क्रमांक पहिल्यांदाच तयार करण्यात आलाय. जर तुमचे मासिक वेतन १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT