आज सराफा बाजार उघडात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिका-इराणमधील सकारात्मक वाटाघाटींमुळे बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठी दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति तोळा १,५१,०९० इतकी रूपये आहे.
आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर काय ?
आज देशात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,०९० रुपये प्रति १० तोळा तर १५,१०९ रुपये प्रति ग्रॅमवर आला आहे. दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३८,४९० रुपये प्रति १० ग्रॅम तर प्रति ग्रॅम १३,८४९ रुपये झाला आहे.
प्रमुख शहरांमधील १० ग्रॅम सोन्याचा भाव (२४ कॅरेट / २२ कॅरेट):
मुंबई, पुणे: २४ कॅरेट - ₹१,५१,०९० | २२ कॅरेट - ₹१,३८,४९०
दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,५१,१२४ | २२ कॅरेट - ₹१,३८,८६४
चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,५३,३०५ | २२ कॅरेट - ₹१,४०,०२९
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे. आज चांदीचा भाव सुमारे ६,००० रुपयांहून अधिक घसरून २,४६,८०० ते २,६०,००० रुपये प्रति किलोच्या दरम्यान इतका पोहचला आहे. मागील काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेच्या दिशेने सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता कमी झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. सोन्यावरील दबाव वाढला आहे. सोन्याचे भाव उच्चांकावर असताना गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली (Profit Booking) केल्यामुळे बाजारात सोन्याची विक्री वाढली आणि भाव खाली आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.